ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

देशी व विदेशी दारू अवैद्य वाहतूक करणारा पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात


  • हरीनाथ डांगे (narayangaon)
  • Upadted: 10/28/2020 9:12:01 PM

पुणे ग्रामीण दि २७ :- पुणे नारायणगाव येथे दारू वाहतुक : करणाऱ्या  आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दि २७ रोजी दुपारी पुणे ग्रामीण  डॉ. अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक यांनी अवैद्य धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट  यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नारायणगाव पो. स्टे. च्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. व नारायणगाव पो. स्टे. च्या हद्दीतील पूणे नारायणगाव-खोडद रस्त्याने पथकाचे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग चालु असताना एक स्विफ्ट डिझायनर गाडी नं. एम. एच. 12 एल. पी. 9996 ही वेगात व संशयास्पदरित्या खोडद बाजुकडे जाताना दिसली. सदर गाडीचा पथकाने पाठलाग करून हिवरे तर्फे नारायणगाव येथे गाडीला अडवून गाडीतील दोन इसमांकडे विचारपुस केली असता त्यांची नावे निलेश बबन पळसकर वय – 36 वर्षे, रा. जांबुत ता. शिरूर, जि. पुणे व अरुण कुमार रामप्रसाद राय यादव वय- 30 वर्षे, रा. सध्या रा. जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे मुळ रा. टूला मगलाहिया, मसरक पूर्व, ता. मसरक जि. छापरा, राज्य – बिहार असल्याचे सांगितले. सदर गाडीची पाहणी केली असता त्यातमध्ये विनापरवाना, बेकायदेशीर देशी-विदेशी दारू वाहतुक करताना मिळुन आल्याने तात्काळ दोन पंचांना बोलावून ₹ 45, 504 किंमतीची दारु व ₹ 4,लाख75 हजार किंमतीची स्विफ्ट डिझायनर कार असा एकुण ₹ 5,लाख 20 हजार 504 रूकिंमतीचा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करून, आरोपी व मुद्देमाल नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींविरुद्ध नारायणगाव पो. स्टे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पो. हवा. शंकर जम, पो. हवा. शरद बांबळे, पो. ना. दीपक साबळे यांचे पथकाने केली आहे.

Share

Other News