“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा लोकप्रतिनिधी व मान्यवरांकडून आढावा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/01/2026 5:51 PM

नांदेड :- तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथे आयोजित “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आतपर्यंतच्या कामकाजाचा  आज लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी एकत्र येत आढावा घेतला.


जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उप जिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.


आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, नांदेडसह राज्याच्या वैभवात भर घालणारा हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी देशभरातून भाविक येणार आहेत. कार्यक्रमासाठी आपली सेवा महत्त्वाची ठरणार आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आयोजन समिती यांच्या समन्वयातून कार्यक्रम यशस्वी करूया. प्रत्येकाने या ऐतिहासिक सोहळयात आपला सहभाग नोंदवावा.असे आवाहन त्यांनी केले.


मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात नागपूर, नांदेड व मुंबई येथे ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम साजरा होत आहे. नांदेड येथील २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या सोहळ्यास देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले,  ५२ एकर परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती, महालंगर, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र, ३५० हून अधिक स्टॉल्स, आरोग्य शिबिरे, सुव्यवस्थित पार्किंग व वाहतूक आराखडा उभारण्यात येत आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, हाच प्रशासनाचा संकल्प आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या