आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून व माझ्या विशेष प्रयत्नातून संत रोहिदास चौक ते MIDC हद्द पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
हा रस्ता केवळ कुपवाड परिसरातील नागरिकांसाठीच नव्हे तर, या भागातील व्यापारी, औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि वाहनधारकांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. अखेर सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे या कामाला मंजुरी मिळाली असून, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे, वाहतूक सुरळीत होणार आहे.