सांगलीतील पत्रकार नगर मधील मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर, स्थानिक नागरीक त्रस्त...स्थानिक नागरिकांची लोकहित मंचकडे कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/07/2024 12:08 PM

*सांगलीतील पत्रकार नगर मधील मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर स्थानिक नागरिकांना कुत्र्यांचा हो
           सांगली महानगरपालिकेने पत्रकार नगर मध्ये डॉग व्हॅन  पाठवून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी केली मागणी सांगली प्रतिनिधी : सांगलीतील पत्रकार नगर मध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे येथील स्थानिक नागरिकांना याचा फार त्रास होत आहे या परिसरामध्ये भयानक प्रमाणात मोकाट कुत्री वाढलेली आहेत सदर रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ही भटकी कुत्री अंगावर जातात, नागरिकांच्या मागे धावून जाणे येथील नागरिक जो मुठीत  धरून जात आहेत स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांची कोणतीही दखल घेतली नाही याचे कारण काय या भागामध्ये एवढी कुत्री वाढली आहेत की नागरिक जाताना रस्त्यावरती भीतीमय वातावरण झाले आहे पत्रकार नगर, कृष्णा हॉस्पिटल परिसर, मिथिला नगरी, या रोडवरती कुत्र्यांचे झुंडच्या झुंड असते  एवढ्या प्रमाणात कुत्री रोडवरती थांबून असतात सकाळी या रोडवरती लहान मुले शाळेला जात असतात त्यांच्या सुद्धा कुत्रीही अंगावर धावून  जाऊन जातात एखाद्याचा बळी गेल्यावर महापालिका जागे होणार का? हा स्थानिक नागरिकांचा महानगरपालिकेला प्रश्न आहे त्यांना जनतेचे जिवाजी पर्व आहे का नाही? सांगली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग  कोमात आहे का? सांगली महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी काय करतात त्यांना पण नागरिकांची चिंता नाही का त्यांना या कुठल्याही गोष्टीचा गंभीर्य नाही या पत्रकार नगर मधील मोकाट कुत्र्यांचा लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी लोकहित मंच सांगलीची मागणी आहे मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या