विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना निलंबित करा

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 30/06/2020 9:05 PM

कोरची - आशिष अग्रवाल कोरची येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रफुल कुळसंगे यांना निलंबित करा अशी मागणी बिहीटेकला येथील नागरिकांनी केली असून मिळालेल्या माहितीनुसार 26 जुनला सकाळी विद्युत विभागाचे कर्मचारी मेंटेनन्स च्या कामाकरिता मजूर घ्यायला बिहीटेकला येथे गेले असता तेथील प्रमुख नागरिकांनी सांगितले की नियमित कामावर येणारे दोन कामगाराला घेऊन जाऊ शकता परंतु बाकीचे कामगार आज येऊ शकणार नाही कारण आज 60 गावच्या देवीचे पूजन करून तालुक्यातील लोक पोलो ठेवून काम बंद ठेवत असतात. 60 गाव च्या देवीच्या नावाने पोलो हा तालुक्यातील जनतेच्या श्रद्धास्थान असून यामध्ये नागरिकांची पूर्वीपासून खूप मानता आहे. परंतु जेव्हा काम बंद आहे तर विद्युत सुरू ठेवून काय अर्थ असे सांगून विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रफुल कुळसंगे यांनी दिले असल्याचे प्रतिपादन त्यांच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. सकाळी नऊच्या दरम्यान बिहीटेकला येथील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला व बिहीटेकला येथे विद्युत पुरवठा कोटरा फिडर मधून देण्यात आलेला असून बिहीटेकला क्षेत्रातील भिमपुर, सोहले, मरकेकसा, बिहीटेखुर्द मध्ये विद्युत पुरवठा सुरळीत पणे सुरु असल्याचे लक्षात येता बिहीटेकला येथील नागरिकांनी विद्युत विभागाचे कार्यालय रात्रीच गाठले. परंतु कर्मचार्‍यांनी सांगितले की कुळसंगे साहेब नागपूर येथे गेले आहेत. नुकताच आरमोरी येथे कोरोना पॉझिटिव्ह निघालेला रुग्ण हा नागपूर येथून आलेला होता म्हणून लोकांची भीती पाहता बिहीटेकला वासियांनी प्रफुल कुळसंगे ला सुद्धा कोरोंनटाईन करण्याची मागणी सुद्धा केली आहे. त्यावेडी उपस्थित ऑपरेटरने दिलेल्या माहितीप्रमाणे 26 जूनला सकाळी एकदाही लाईट ट्रिप झाली नाही मग विद्युत पुरवठा खंडित का करण्यात आला? तोही फक्त बिहीटेकला या गावचा. सोहले या गावाची ए.बी. स्विच बंद करून बिहीटेकला येथील लाईन बंद करण्यात आली व कार्यालयातून हैंड ट्रिप ची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. बिहीटेकला येथील जिल्हा परिषद शाळेत लहान बाळा 5 लोक बाहेर गावातून आले असल्यामुळे त्यांना कोरोटाईन करण्यात आले आहे व दोन वर्षांपूर्वी याच शाळेत एका विद्यार्थ्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता आणि सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे विषारी जीवजंतू आपल्या बिलाच्या बाहेर पडतात. नियमित वीज बिल भरून सहकार्य करणार्‍या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला व या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी करावी व कनिष्ठ अभियंता कुळसंगे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत विचारणा करण्याकरिता कुळसंगे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता कुळसंगे यांचे नंबर बंद होते.

कोट - दिवसभर काही कारण नसतानी विद्युत पुरवठा खंडित करणे चुकीचे असून यामुळे बिहीटेकला येथील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला. काम नाही तर विद्युत पुरवठा सुद्धा नाही हे वक्तव्य म्हणजे आमच्या देवीचा सुद्धा अपमान असल्यामुळे कुळसंगे यांच्यावर कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात यावे* जगदीश कपूरडेहरिया माजी उपसरपंच ग्रा. पं. बिहीटेकला

Share

Other News

ताज्या बातम्या