जन्म संस्कार' पुस्तक प्रकाशन समारंभ

  • Y.D.Dhake (Bhusawal)
  • Upadted: 27/11/2023 4:53 PM

भोसरी: समता भातुमंडळ पिंपरी चिंचवड व लेवा पाटीदार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंकुशराव लांडगे सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये डॉ.एल झेड पाटील लिखित जन्म संस्कार या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जन्म संस्कार या पुस्तकामध्ये रुतू संगोपन, रूतू शांती, गर्भाधान, पुंवसन, डोहाळे जेवण ,पाचवी ,पाठवणी, नामकरण ,जावळे काढणे ,कान टोचणी ,मुंज ,कुलदैवत पूजन, इत्यादी संस्कारांची अचूक माहिती देण्यात आलेली आहे. असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.या प्रकाशन सोहळ्याला माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक नामदेव ढाके, ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक ह भ प डॉ.रवींद्र भोळे, सिताराम राणे अध्यक्ष, डॉ. नीरा पाटील, डॉ.एल झेड पाटील, भागवत झोपे, नितीन बोंडे, भागवत चौधरी, रवींद्र बराटे सचिव, रघुनाथ फेगडे सहसचिव, निनाद वायकोळे, सुरेश फेगडे, हेमंत झोपे, दिगंबर महाजन, किरण चौधरी यांचे सह समताभातृ मंडळ व लेवा पाटीदार मित्र मंडळ सांगवी यांचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.  या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी इंगळे यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या