छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजू महिलांना अन्नधान्य वाटप

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 31/03/2023 9:24 PM

नांदेड :- महिलाही अतिशय कर्तृत्ववान असून आपल्या कुटुंबाला योग्य दिशा देऊन प्रगतीच्या वाटेवर नेण्याचे काम करते लहान मोठ्या पासून सर्वांना योग्य संस्कार देणे महिलाही स्वावलंबी होऊन उद्योजक बनावी यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित साधून वार्डतील गरजू महिलांना छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने उपसरपंच नगर दरोडा खुर्द येथे दिनांक 30 मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करून गरीब महिलांना एक चांगला आहार मिळावा यासाठी गहू तांदूळ धान्य वाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक सांची महिला बचत गटाचे अध्यक्ष सौ शिल्पाताई गच्चे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सूर्य उद्धव खिलारे संभाजी सावते तेलंग साहेब सावंत मॅडम पत्रकार गंगाधर गच्ची आदी मान्यवरांची उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित महिलांना सावंत  मॅडम सूर्यउद्धव खिलारे तेलंग साहेब यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर शिल्पा गच्चे यांनी आपल्या भाषणामध्ये कृतत्वान महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी मा जिजाऊ मा रमाई यांच्यासारखा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मुलांना कळवावे त्यांच्यावर चांगले संस्कार घालावे त्यामुळे कुटुंबाचा व समाजाचा विकास होतो असे प्रतिपादन आपल्या भाषणामध्ये अध्यक्ष यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी लाटकर यांनी केले तर आभार आशाताई सावंत यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांदणी पाटील कोमल गुट्टे पार्वती गंगासागरे  शिवकांता पवार. सरस्वती कंधारे आधी महिलांनी परिश्रम घेतली शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या