*महाराष्ट्र शासनाच्या गाड्या अधिकाऱ्यांच्या खाजगी मालकीच्या?*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 24/01/2023 10:44 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी: दहिवडी

  महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयाचे खाजगी गाड्यांवर अधिकारी तथा शासकीय कर्मचारी हे महाराष्ट्र शासन अशी पाटी अनधिकृतपणे लावू शकत नसल्याचे परिपत्रक असतानासुद्धा कित्येक महाबहाद्दर अधिकारी आणि कर्मचारी या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना महाराष्ट्र शासन अशा नावाच्या पाट्या दिसून येत आहेत.त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या गाड्या अधिकाऱ्यांच्या खाजगी मालकीच्या आहेत की अधिकाऱ्यांच्या गाड्या शासनाच्या मालकीच्या आहेत हे कळायला मार्ग नाही,असे चित्र आहे.त्यामुळे याच वास्तवतेला धरून लोकही चर्चा मोठया आवडीने करताहेत.
        आपापल्या खाजगी दुचाकी व चारचाकी गाड्यांवर महाराष्ट्र शासन नावाची अनधिकृत पाटी लावून हे अधिकारी कर्मचारी नेमके कुणाला फसवत आहेत? अशी चर्चा आता सर्वसामान्य नागरिक करू लागला आहे.
       नरेशकुमार जैन यांनी सादर केलेल्या तक्रारीवरून परिवहन आयुक्त कार्यालयाने सदर आदेश सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना जारी केले असून या अधिकाऱ्यांचे या आदेशाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.त्यामुळेच हे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासनाच्या नावाची अनधिकृत पाटी लावताना दिसताहेत.त्यामुळे आरटीओ'ने या मनमानी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावावी, अशी मागणी सर्वसामान्य लोक करत आहेत.

   सर्वसामान्य लोकांवर नेहमीच कारवाईचा बडगा उगारणाऱ्या आरटीओकडून मनमानी करणाऱ्या या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाईची चपराक मिळणार का? असा सवाल सामान्य जनतेतून उमटत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या