आवाहन

BREAKING NEWS

सिटी कमांड सेंटरला नुतन आयुकतांची भेट, कामकाजाची घेतली माहिती...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 8/14/2022 9:12:29 AM


   सांगली: महापालिकेचे नूतन आयुक्त सुनील पवार यांनी आज मंगलधाम येथील सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
   यावेळी सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटर मध्ये सुरू असणाऱ्या सेवांची माहिती घेतली. तसेच येथील कॅमेराद्वारे पूर पट्ट्यातील भागावर विशेष लक्ष ठेवले जाते तसेच अत्याधुनिक सुविधा असणारे हे सेंटर नागरिकांना आपत्ती काळात मदत करणारे ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे आणि सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते यांनी आयुक्त सुनील पवार यांचे स्वागत केले. यावेळी बंदेनवाज पिराजादे, सूरज माने, अनिता जाधव, हैदर मुलाणी, ऋषिकेश डुबल, नितीन महापूरे, अंगरक्षक वसीम सय्यद आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या