ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 6/27/2022 7:44:35 PM

गडचिरोली, दि.27: महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी, 2018 राज्यातील ग्रामिण व शहरी भागात नागरिकांपर्यत शासकीय,निमशासकिय व खाजगी सेवा पोहचविण्याकरीता प्रत्येक ग्राम पंचायतस्तावर व नगर परिषद,नगर पंचायतस्तावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे असल्यामुळे,गडचिरोली जिल्हयातील रिक्त असलेल्या 343 ग्राम पंचायतस्तावर व 03 नगर पंचायतस्तावर आपले सरकार सेवा केंद्र रिक्त असल्याने महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय दिनांक 9 जानेवारी,2018 च्या परिच्छेद 1 (अ) व (आ) मधिल निकषानुसार ग्राम पंचायतस्तरावर 351 व नगर पंचायतस्तावर 03 आपले सरकार केंद्र स्थापन करावयाचे आहे.

   गडचिरोली जिल्हयात रिक्त असलेल्या 343 ग्राम पंचायत व 03 नगर पंचायतची यादी व अर्जाचा नमुना,जिल्हयाच्या वेबसाईट (www.gadchiroli.gov.in) या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.तसेच रिक्त असलेल्या ग्राम पंचायत व नगर पंचायतस्तरची यादी व नमुना जिल्हाधिकारी कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालयाचे नोटिस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली असून,अर्जदारांनी दिनांक 25 जुलै 2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथिल सेतू शाखेत विहित नमुन्यात अजर्‍ सादर करावे,असे  गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

Share

Other News