ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

संविधानामुळे मूलभूत हक्क मिळाले : पोलीस निरीक्षक चिंचोळकर


  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 11/27/2021 7:07:36 PMसंविधान प्रस्तावना भेट देण्याचा भीम आर्मीचा उपक्रम

रोहित बोंबार्डे
प्रतिनिधी तुमसर :- संविधानाचे वाचन आपण न केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आहे, केवळ एवढीच आपल्याला माहिती आहे. डॉ. आंबेडकरांनी संविधानात नेमकं काय लिहिलंय हे प्रत्येक नागरिकाने समजून घेतलं पाहिजे. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क मिळाले त्यामुळेच आपण आहोत.आपल्या देशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे, यासाठी संविधान एकदा तरी वाचायला हवे,असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी केले.भीम आर्मी सामाजिक संघटना तुमसर भारत एकता मिशन कडून संविधान दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन तुमसरला भारतीय संविधान प्रस्तावना भेट दिली.यावेळी अभाअंनिस तालुका संघटक प्रा. राहुल डोंगरे सर,भीम आर्मी चे अध्यक्ष रजनीश बन्सोड,अभिजित रामटेके,कुणाल लेंडे, योगेश उके राजा बोंबार्डे, अनिकेत डोंगरे,
प्रोहित मेश्राम,सतिश रंगारी, पंकेश बोंबार्डे,संघर्ष मेश्राम, ऋत्विक रंगारी,धर्मपाल मेश्राम,
सुभोद नागदेवे, मंदिप सुखदेवे उपस्थित होते.

Share

Other News