ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

** तर संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार , कुपवाड शहर संघर्ष समिति व कुपवाड व्यापारी संघटनेचा " सुचक" इशारा...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/25/2021 1:57:49 PM


    कुपवाड शहर संघर्ष समिती आणि कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या वतीने आज कुपवाड मधील मुख्य रस्ता व रोडवरील स्ट्रीटलाइट आणि ड्रेनेज व्यवस्था या संदर्भात महानगरपालिकेच्या मुख्य नगरअभियंता मा.पांडव साहेब, कुपवाड प्रभाग समिती क्र.०३ चे सहा.आयुक्त मा.दत्तात्रय गायकवाड साहेब,कुपवाड पोलिस स्टेशनचे सहा.निरीक्षक मा.अविनाश पाटील साहेब,आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या सोबत बैठक संपन्न झाली.

   सदर खड्डेमय रस्ता व स्ट्रीटलाइट,ड्रेनेज,कुपवाड मधील स्वच्छतेचे काम चालू नाही झाले तर कुपवाड शहर संघर्ष समिती व कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या वतीने संबंधित अधिकारी यांच्या तोंडाला काळे फ़ासण्याचा इशारा देण्यात आला.

    कुपवाड मधील या खड्डेमय रस्त्यामुळे होणारे अपघात व न मिळणाऱ्या मूलभूत सुविधा याबाबत चर्चा करताना चार दिवसात रस्त्याचे काम चालू करण्याचे आश्वासन मनपा प्रशासनाने दिले आहे.

    यावेळी कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे,कार्याध्यक्ष अनिल कवठेकर,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवळ,खजिनदार प्रकाश व्हनकडे,संचालक राजेंद्र पवार,बिरु आस्की,समीर मुजावर,सचिन नगरदेकर,जितेंद्र कुंभार,लक्ष्मण पाटील,जगन्नाथ वाघमोडे,अभिजीत कोल्हापुरे,दस्तगीर नदाफ उपस्थित होते..

Share

Other News