ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लसीकरणासाठी पार्डी गावात जाऊन लोकांना केले प्रवृत्त.


  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/25/2021 5:08:00 AM

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील कोविड-19 लसीकरणासाठी अधिकाधिक नागरिकांचा सहभाग घ्यावा व त्यांना संभाव्य धोक्यापासून दूर ठेवता यावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतलेल्या विशेष लसीकरण मोहिमेसाठी आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पार्डी गावात घरोघरी जाऊन लोकांना प्रवृत्त केले. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लोकांना आवाहन करुन लसीकरणाचे महत्व पटवून दिले.
जिल्हा प्रशासनात अनेक अधिकारी व कर्मचारी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून समाजाप्रती व आपल्या गावाप्रती उत्तरदायीत्व म्हणून आज 24 नोव्हेंबर रोजी आपआपल्या गावात लसीकरण साक्षरतेसाठी व लोकांना लस घेण्यास प्रवृत्त केले. लसीकरणाची ही मोहिम अधिक व्यापक केली जाणार असून कोणताही नागरिक यापासून वंचित राहू नये याची दक्षता जिल्हा प्रशासनातर्फे घेतली जात आहे.

Share

Other News