ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

गडचिरोली जिल्ह्यात आज 148 जण कोरोनामूक्त तर नवीन 63 कोरोनबधीत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 10/17/2020 10:40:00 PM

गडचिरोली,(जिमाका),दि.17:-

जिल्ह्यात आज 63 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच एकुण सक्रिय बाधितांमधील आज 148 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकुण सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा 824 झाला. आत्तापर्यंतची एकुण कोरोना बाधित संख्या 4432 वर पोहचली आहे. यापैकी 3572 जणांनी कोरोनावर मातही केली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात 36 मृत्यूंची नोंद झाली आहे. नवीन 2 मृत्यूमधे तळोधी चमोर्शी येथील 24 वर्षीय युवकाचा व आशिर्वाद नगर गडचिरोली येथील 60 वर्षीय निवृत्त शिक्षकाचा समावेश आहे.

यानुसार जिल्हयात सद्या रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.60 टक्के आहे. सक्रिय रूग्णांची टक्केवारी 18.59 असून मृत्यूदर 0.81 टक्के आहे.

आज नवीन 63 बाधितांमध्ये गडचिरोली 42, अहेरी 2, आरमोरी 3,  भामरागड 0, चामोर्शी 4, धानोरा 1, एटापल्ली 3, कोरची 1, कुरखेडा 2, मुलचेरा 0, सिरोंचा 2 व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे. 

तसेच आजच्या 148 कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 39, अहेरी 9,  आरमोरी 26, भामरागड 0, चामोर्शी 7, धानोरा 31, एटापल्ली 19, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 2, कुरखेडा 4 व वडसा येथील 11 जणांचा समावेश आहे.


राजेश नाथानी (गडचिरोली तालुका प्रतिनिधी)
94223 55550

Share

Other News