आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी आज जाहीर केलेली भूमिका ही सांगलीकरांसाठी धक्कादायक आहे राजकारणाचे पलीकडे जाऊन आपले शहर व आपल्या गावाचा विकास महत्त्वाचा असतो
आमदार सुधीर दादा यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या ताकदीप्रमाणे विधानसभा मतदारसंघातील काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आहे त्यात त्यांना काही प्रमाणात यश पण आलेला आहे.
दादांनी असा निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा असे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून वाटते.
आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी दहा वर्ष आमदारकी सांभाळलेली आहे मात्र त्यांनी अचानक असे पत्रक काढून मी उभारणार नाही सांगण हे सकृत दर्शनी पटण्या सारख नाही असे वाटते मग ह्यात स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राजकीय संन्यास घेतला मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातील परत ते राजकारणात सक्रिय झाले. असा राजकीय डाव आखण्यासारखे दादा मुरब्बी राजकारणी नाहीत मात्र शंकेला वाव मिळतो असो दादांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.