प्लास्टिक सर्जरी, जनजागृतीची गरज : डॉ विनायक लोकरे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/04/2024 7:25 PM


    ऑनलाइनच्या जमान्यात जीवन धक्काधक्कीचं आणि धावपळीचे झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. पण प्लास्टिक सर्जरी याविषयी मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे. याची माहिती सर्वसामान्यांना असणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक वेळा रस्त्यावरील एक्सीडेंट किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करत असताना घडलेला अपघात असेल, यातून शरीरापासून वेगळ्या झालेला अवयव प्लास्टिक सर्जरी मुळे सहा ते सहा तासात त्यावर उपचार घडले तर ते आपण वाचवू शकतो. अन्यथा विनाकारण पेशंटला यानंतर होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक जखमा असतात त्या प्लास्टिक सर्जरी मुळे लगेच बरा होऊ शकतात. अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट म्हणजे प्लास्टिक सर्जरी पण याकडे जनसामान्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आहे. प्लास्टिक सर्जरी म्हणजे सौंदर्य पुरताच मर्यादित राहिला आहे. त्यामुळे याची जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. असे मत प्लास्टिक सर्जन डॉ विनायक लोकरे यांनी आपुलकीच्या कट्ट्यावरती काल व्यक्त केले.
     *या कार्यक्रमाचे आयोजन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले. ते म्हणाले लोकशाहीला अत्यंत गरजेचा असलेला आपला मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा एक दिवस देशासाठी म्हणून ७ मे ला सर्वांनी मतदान करावे. असे आवाहन त्यांनी केले* 
     यावेळी राजकुमार पेडणेकर, रेखा पाटील, जितेंद्र भोसले, पांडुरंग शिंदे, विजयमाला कदम,भारती पाटील, उज्वला पेडणेकर, आदर्श पेडणेकर,अमृता निरगुडे, विजया दाभोळे, भीमराव कुंभार, प्रकाश मालपाणी, दर्शना घोंगडी, एकनाथ नलवडे, खुजगावकर,साठे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या