श्रीमती राजमती नेमगोंड पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये सौ बुवा यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/04/2024 5:48 PM

श्रीमती राजमती नेमगोंडा  पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये आज दि 20 एप्रिल 2024 रोजी माध्यमिक विभागाकडील सहाय्यक शिक्षिका सौ.बाळाबाई बंडू बुवा यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य देवता सरस्वती पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रतिमापूजन सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.  सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करून शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री सुनील पाटील सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये बुवा मॅडम यांच्या हसतमुख व्यक्तिमत्व , विद्यार्थीप्रियता, तसेच मनमिळावू स्वभाव अशा विशेष गुणांचा उल्लेख केला. विद्यार्थी प्रिय तसेच शिक्षकप्रिय असणं हा सौ बाळाबाई बुवा यांचा खूप विशेष गुण असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. यानंतर सत्कारमूर्ती बाळाबाई बंडू बुवा तसेच श्री बंडू बुवा या उभयतांचा साडी ,ओटी साहित्य, शाल -श्रीफळ बुके तसेच सरस्वतीची चांदीची मूर्ती ,दि.ब. अण्णासाहेब लठ्ठे यांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री .दीपक चौगुले  तसेच मा. श्री शरद पाटील या मान्यवरांचे स्वागतपर सन्मान करण्यात आला. यावेळी मॅडमच्या सहकारी  शिक्षका डॉ .शोभा पाटील व श्री राजीव कांबळे सर यांनी सुखद आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती बुवा मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा  व शाळा समितीचे चेअरमन श्रीमती अनिता पाटील यांनी सौ बुवा मॅडम यांना भावी निरामय आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पर्यवेक्षक श्री अनिल कुमार कुदळे तसेच सत्कारमूर्ती सौ बुवा मॅडम यांचे चिरंजीव राहुल तसेच भाचे श्री बुवा यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्युनियर विभाग प्रमुख डॉ. अविनाश पाटील, शिक्षक प्रतिनिधी सौ सुरेखा सेतसंदी , शिक्षकेतर प्रतिनिधी श्री वाघमारे सर , तसेच माजी मुख्याध्यापक , आप्तेष्ट मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार उच्च माध्यमिक विभाग प्रमुख डॉ श्री अविनाश पाटील सर यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राजश्री पेटारे , सौ. सरिता पाटील यांनी  केले.

Share

Other News

ताज्या बातम्या