माधवनगर व बुधगाव वहातुक कोंडी प्रश्नी बैठक संपन्न, रस्ता रुंदीकरण व रिंग रोड ची बैठकीत मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/02/2024 2:55 PM

सांगली वरून तासगावला जाणाऱ्या रोडला बुधगाव माधवनगर या ठिकाणी रोज होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आज बुधगाव येथे बुधगाव व्यापारी असोसिएशन,माधवनगर व्यापारी असोसिएशन व माधवनगर,बुधगाव येथील नागरिक यांच्यावतीने मीटिंग आयोजित केली होती.यावेळीस माधवनगर ते बुधगाव हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुपचं अपुरा पडत आहे ही दोन्ही गावे सांगली शहराच्या लगत असल्यामुळे या रस्त्यावर खुप मोठ्या प्रमाणात रहदारी आहे त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता रिंग रोड असणे ही गरजेचे आहे अशी प्रमुख मागणी होती यावेळी बैठकीला मार्गदर्शन श्री सतीश साखळकर (दादा) यांचे लाभले. या बैठकीला बुधगावचे- बजरंग (भाऊ)पाटील,उपसरपंच अविनाश शिंदे, माजी सरपंच प्रविण (भैय्या)पाटील, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल भाऊ डुबल,प्रशांत मोहीते, बाळासाहेब पाटील, कुलदीप पाटील, विनायक शिंदे. , मनोहर भगत, मयुर पाटील,विजय पाटील,संदीप पवार,माधवनगर  सरपंच अंजू तोरो. माजी सरपंच अनिल पाटील,  व्यापारी असोसिएशनचे  अध्यक्ष प्रदीप बोथरा  दत्ता पाटील,शेखर तोरो ,विक्रम  मेहता,माणिक पाटील, गजानन साळुंखे,आनंद देसाई  आदी उपस्थीत होते. आयोजन सामाजिक कार्यकर्ते संग्रामसिंह पाटील यांनी केले होते.

Share

Other News

ताज्या बातम्या