राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलनाला यश. वेकोली कंत्राटी कामगारांच्या मागन्या मंजूर.

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 09/02/2024 12:53 PM

🔳 राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलनाला यश. 

◼️ वेकोली कंत्राटी कामगारांच्या मागन्या मंजूर.

चंद्रपूर :- मागील एक वर्षा पासून वेकोली व कंत्राटदार यांचे विरोधात आयटक यूनियनसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे सतत वेकोली अधिकारी तथा क्षेत्रीय महाप्रबंधक याना निवेदन देण्यात येऊन वेकोली वणी क्षेत्रा अंतर्गत कोळसा परिवहन करणार्या ठेकेदारांतर्फे कंत्राटी कामगार ड्राइवर, हेल्पर, सुपरवायझर यांना वेकोली केंद्र शासनाच्या नियम एचपीसी प्रमाणे वेतन, ८ तास कामाचा वेळ, २६ दिवस नौकरी तथा उपस्थित असलेल्या कामाच्या दिवसांचा मोबदला द्यावा ही मागणी करण्यात आली होती.

वेकोली अधिकारी व कंत्राटदाराच्या संगनमताने होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अनेकदा आंदोलने करण्यात आली होती. तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला यानी या कामगारांना न्याय मिळावा या करीता नागपुर हिवाळी अधिवेशनात यशवंत स्टेडियम येथे तब्बल ५ दिवस आंदोलन देखील केले. परंतु निगरगट्ठ वेकोली प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यानंतर अनेकदा निवेदने, बैठका एव्हढेच नाही तर दस्तुरखुद या जिल्हयाचे संपर्कमंत्री धर्मराव आत्राम यांनी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व वेकोली अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगारांना न्याय द्यावा हे निर्देश दिल्यानंतर सुद्धा कामगारांवर अन्याय करने आजपर्यंत सुरूच होते.

शेवटी नाईलाजास्तव दिनांक ८/०२/२४ पासून काम बंद आंदोलन जाहीर करण्यात आले. जाहीर करण्यात आंदोलनाला या क्ष्रेत्रातील ८ कंपन्यांमधील कामगारांनी पाठिंबा दिल्याने. वेकोली चे कोळसा परिवहन पूर्णपणे ठप्प झाले असल्याने आंदोलनाचं धसका घेत वेकोली ने बैठकीचा पुढाकार घेऊन चर्चा कण्याची विनंती केली असता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितिन भटारकर व सिन्नू गोसकुल्ला यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले. कामगारांनी काम बंद करुन सुरु केलेल्या आंदोलनाच्या मंडपात वेकोली येथील वरीष्ठ स्तराचे अधिकारी स्वतः येत कामगारांच्या मागण्या मान्य करीत असल्याचे जाहीर केले.

या बैठकित कामगारांतर्फे ९ तास काम घेणार, एचपीसी नियमाप्रमाणे वेतन देणार, पेमेंट स्लिप देणार, महिन्यात ४ सुट्टी कामगारांना देनार असल्याचे लिखित वेकोली अधिकाऱ्यांनी मान्य केल. व क्षेत्रीय व्यवस्थापाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हे सर्व मुद्दे लिखित स्वरूपात दिले. यावेळी राकाँ जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यानी कंत्राटदार सदर लिखित आश्वासने पाळली नाही तर याहून तीव्र आंदोलन करणारं असल्याची तंबी देखील दिली. व सर्व मागण्यांची पूर्तता झाली असल्याने सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.

सदर आंदोलन तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुला यांच्या नेतृत्वात झाले असुन यावेळी श्रीमती रेखा कैंथल, बजरंग दल महामंत्री राज शेट्टी, योहान इरुगुरला, रितिक मड़ावी, अक्षय कोवले, गणेश बावणे, रोशन फुलझेले, सौरभ घोरपडे, प्रफुल कुचनकर, पियुष चांदेकर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या