ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कोरची तालुक्यातील सर्व आधारभुत धान्य खरेदी केंद्र बारदाने उपलब्ध करून तातडीने सुरू करा - मनोज अग्रवाल


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 11/25/2021 7:54:54 AM


जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली मागणी


कोरची - आशिष अग्रवाल
                  कोरची तालुका हा आदिवासी बहुल मागासलेला तालुका असून या तालुक्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती आहे. तालुक्यातील बहुतेक शेतकरी हे हलक्या प्रजातीच्या धान्याची लागवड करीत असून सद्यस्थितीत बहुतेक शेतकऱ्यांची पिक कापणी सुद्धा झालेली आहे. मागील दोन वर्षापासून कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे पहिलेच शेतकऱ्यांवर हातावर पोट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे व खुल्या बाजारपेठेत सुद्धा धान्यांना भाव नसल्यामुळे तात्काळ कोरची तालुक्यातील सर्व आधारभुत धान्य खरेदी केंद्र बारदाना उपलब्ध करून तातडीने सुरू करण्यात यावे व तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली नसल्यामुळे हंगाम 2021- 22 मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या लाभापासून शेतकरीवर्ग वंचित राहतील त्यामुळे हंगाम 2021- 22 मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन शेतकरी नोंदणी पुन्हा सुरू करण्यात यावी व खरीप हंगाम 2021- 22 आणेवारी तात्काळ जाहीर करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना काँग्रेस कमेटी कोरचीचे प्रभारी तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल यांनी तहसीलदार तहसील कार्यालय कोरची यांचेमार्फत निवेदनातून केली आहे.

Share

Other News