केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर , प्रदीप सिंह देशात पहीला तर महाराष्ट्रातुन अभिषेक सराफ अव्वल...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/08/2020 1:41 PM



     नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने बाजी मारली असून देशात अव्वल आला आहे. 

     महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. तर जतिन किशोर दुसऱ्या क्रमांकावर असून प्रतिभा वर्मा तिसऱ्या आणि महिला उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 

  परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी युपीएससीच्या अधिकृत वेसबाईटवर जाहीर करण्यात आली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९  उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
      युपीएससीने सप्टेंबर २०१९ मध्ये पार पडलेल्या लेखी आणि फेब्रुवारी-ऑगस्टदरम्यान झालेल्या मुलाखीत आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली असून ११ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान २०१९ मध्ये प्रथमच लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) कोट्यातून ७८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या