दहा हजाराची लाच घेताना लाचखोर रवींद्र ठाणगे अखेर एसीबीच्या जाळ्यात

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 15/06/2021 10:00 PM

बीड तहसील कार्यालयातील वादग्रस्त ठरलेला आणि लाचखोर पुरवठा निरीक्षक रवींद्र ठाणगे यांना आज दहा हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडले आहे.
बीड तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक असलेले रवींद्र ठाणगे यांना आज दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले आहे.
यापूर्वी देखील बीड तहसील कार्यालयातच लाच
स्वीकारताना चा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
यामध्ये रवींद्र ठाणगे याने एका राशन दुकानदाराकडून ही लाच स्वीकारली होती. यानंतर देखील अनेक तक्रारी रवींद्र
ठाणगे यांच्या विरोधात प्रशासनाकडे गेल्या होत्या परंतु प्रशासन यावर कुठलीच कारवाई करत नव्हते. परंतु आज अखेर सतत वादग्रस्त ठरलेला आणि लाचखोर पुरवठा निरीक्षक रवींद्र ठाणगे याला लाच स्वीकारताना तहसील कार्यालयातुनच अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या पथकाने तहसील कार्यालयात सापळा रचून केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या