इस्लापूर येथील सहस्त्रकुंड धबधबा वाहतोय ओसंडून,निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 15/06/2021 9:35 PM

नांदेड:पावसाळ्यात अनेक प्रकारचे निसर्गरम्य दृश्य दिसून येतात.त्यात धबधबा पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात.दरवर्षी पावसाळा सुरु झाल्यानंतर बऱ्याच दिवसाने पाण्याने धबधबा ओसंडून वाहतो. तेंव्हा निसर्गरम्य दिसून येतो.पण या वर्षी अवघ्या दोन वेळेस च्या पावसानेच इस्लापूर येथील धबधबा पाण्याने ओसंडून वाहत आहे.हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी दूर दुरून पर्यटक पाहायला येत आहेत. पर्यटकांची गर्दी झालेली दिसून येते आहे. नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर येथील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा सध्या निसर्गरम्य रूप धारण केले असून हा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे.मान्सूनच्या पहिल्याच पावसाने सगळीकडे नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याची दृश्ये सर्वांनाच आकर्षून घेत आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच धबधबा ओसंडून वाहत असल्याने  सध्या दुरदुरून हा निसर्गरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या