नांदेड मध्ये दोन अज्ञात लुटारूंनी हवेत गोळीबार करून 57 हजार रुपय हिसकावून केला पोबारा.

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 15/06/2021 8:47 PM

नांदेड: गेल्या अनेक दिवसा पासून लूटमारीच्या घटना घडत आहेत.आज मिल्लतनगर भागात दोन लूट मारुनी मायक्रो फायनान्स च्या कर्मचाऱ्यांची बॅग पिस्तूलीने हवेत गोळीबार करून हिसकावून पोबारा केला.त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
नांदेड मध्ये आज बचतगटाची मिटींग आयोजित करण्यात आली होती.मिटिंग संपल्यावर एका व्यक्तीला दोन दरोडेखोरांनी मारहाण आणि बंदुकीतून फायरींग करून त्याच्याजवळील 57 हजार रुपये लुटल्याचा प्रकार आज सकाळी 10 वाजता मिल्लतनगर भागात घडला.शहरातील क्रेडीट अ‍ॅक्सिस ग्रामीण लिमिटेड येथे कार्यरत असलेले  रोहित गुगले हे सकाळी 8 वाजता एका बचगटाच्या मिटिंगसाठी गेले होते.तेथून बचत गटाचे 57 हजार रुपये घेऊन आपल्या दुचाकीने परत जात असतांना मिल्लतनगर भागात त्यांच्या पाठीमागून दोन अज्ञात वेक्ती तोंड बांधून दुचाकीवर आले.
त्यांनी गुगले यांना मारहाण करीत बंदुकीतून हवेत फायरिंग करून 57 हजार रुपये लुटले आणि पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार घटनास्थळी पोहचले. घटनेची माहिती घेऊन आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.हल्लेखोरांच्या शोधात पोलिस पथक कार्यरत करण्यात आले आहे. 
भरदिवसा सुर्य प्रकाशाच्या उजेडात फायरींग  झालेली ही लुटीची घटना नक्कीच चिंता वाढवणारी आहे. इतवारा पोलिस याबद्दलची माहिती जमा करत आहेत.यासंदर्भात माहिती नांदेडचे पोलीस उपअधिक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी दिली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या