बहूजन मुक्ती पार्टीच्या वतीने गरजू वस्तूंच्या भाववाढीमुळे केंद्र सरकार विरोधात धक्का मारो आंदोलन.

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 15/06/2021 7:50 PM

नांदेड :गेल्या काही दिवसापासून जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. न्यूयार्क पेक्षाही भारतात पेट्रोल महाग झाले आहे. दैनंदिन जीवनात गरजेचे असलेले पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती वापराच्या गॅस च्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या.  त्यावेळी सर्वसामान्य जनतेला इंधनातील किमती कमी होण्याची आशा होती पण तसे न होता त्या किमती वाढत राहिल्या सरकारने कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सर्वसामान्य जनतेची लूट करण्यासाठी उत्पादन शुल्क वाढविले परिणामी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याऐवजी वाढल्या. नरेंद्र मोदीच्या भाजपा सरकारने सत्तेत आल्यानंतर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क रु 9.44  होते ते आतापर्यंत वाढवून रुपये 32.90 केले तर डिझेलवर रु. 3.56 पासून रु. 31. 80 एवढे शुल्क  केंद्र सरकार केले आहे. सोबत राज्य सरकारचा टॅक्स आहे यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहे. नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकारने जो टॅक्स लावला आहे.त्यामुळे पेट्रोल डिझेल चे भाव वाढलेले आहेत. यातून जनतेचे आर्थिक व मानसिक शोषण होत आहे. 
 आंतरराष्ट्रीय बाजारात मार्च 2020 मध्ये कच्चा तेलाचे भाव लॉकडाउन मुळे गडगडून प्रति बॅरेल 20 डॉलर वर आले होते. अशा परिस्थितीत पेट्रोल डिझेलचे भाव कमी होण्याऐवजी सरकारने कमी केली नाही जवळ जवळ 80 दिवस कच्च्या तेलाचे दर कमी असताना देखील केंद्र सरकारने दर कमी केले नाहीत हे दर कमी झाली असताना तेव्हा मी नशीबवान पंतप्रधान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाचे भाव कमी होत आहेत. असे भाषणात म्हणत होते.आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी किमतीतील खरेदी करून जास्त भावाने जनतेला देत होते. केवळ भाषणात बोलत होते पण प्रत्यक्षात इंधन तेलाचे भाव वाढवत होते. पूर्वी गॅस सबसिडी मिळत होती नरेंद्र मोदींनी लोकांना बँक खात्यावर सबसिडी देण्याची योजना आनली आधी लोकांच्या खिशातून पैसा काढल्यानंतर बँक खात्यात टाकायला सुरुवात केली.आता हाती सबसिडी न देता जनतेला खुल्या किमतीत खरेदी करावा लागत आहे. आता गॅस ची किंमत रुपये 930 झाली आहे.पूर्वी तीन महिने चालत होता.आता एका महिना संपतो याचा अर्थ गॅस कंपनी पैसा वाढविला आणि गॅसची घनता कमी केली.अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी जनतेची लूट चालू आहे.एकीकडे इंधन तेलाचे दर वाढले आहेत तर दुसरीकडे खाद्यतेलाचे भाव सुद्धा प्रचंड वाढले आहे.शंभर रुपयाच्या आत एक किलो येणार गोडंतेल आज दिडशे रुपयांच्या पुढे गेली आहे. सर्वसामान्य जनतेच्या जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढले आहेत.सर्वसामान्य लोकांचे उत्पन्न घटले आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तू तसेच विजेच्या बिलात प्रचंड वाढ करण्यात आली आहे.घरगुती गॅस खाद्यतेल तसेच किराणामाल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव अवास्तव वाढलेले असल्यामुळे महिलांचे घराच्या आर्थिक बजेट पूर्णपणे कोसळली आहे. सर्वसामान्य स्त्रिया या महागाईमुळे होरपळून निघाले आहेत.नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकारच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी बहुजन व तसेच मुक्ती पार्टी महिला आघाडी च्या वतीने आज कलेक्टर कचेरी व तहसील कचेरी येथे एक दिवस टॅक्सी रिक्षा मोटरसायकल धक्का आंदोलन करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या