शेतकर्याचा समस्या बाबद तालूका कृषी अधिकार्याना अनास्था

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 15/06/2021 6:35 PM


(ता कांग्रेस अध्यक्ष जयंत हरडे यांचा आरोप)
कूरखेडा-
        शेती व शेतकर्यांचा समस्या सदर्भात येथील तालुका कृषी अधिकारी यांचा मनात अनास्था असल्याने त्याना याबाबद भ्रमनध्वनी वर काही तक्रार केल्यास बेजबाबदार उत्तर मीळते असा आरोप तालुका कांग्रेस चे अध्यक्ष जयंत हरडे यानी करीत या बेजबाबदार अधिकारीची चौकशी करीत कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे
       येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून सुरभी बाविसकर कार्यरत आहेत आज येथील शेतकरी पुंडलीक निपाने यानी एका कृषी विक्री केंन्द्रातून ९ थैली धान बियाणे खरेदी केले मात्र या बियाण्यात १० ते १५ टक्के काळा व अपरिपक्व धान निघाल्याने त्यानी याची माहिती तालुका कांग्रेस चे अध्यक्ष जयंत हरडे याना दिली त्यानी यासंदर्भात माहीती देण्याकरीता भ्रमनध्वनी वर तालुका कृषी अधिकारी सुरभी बाविस्कर यांचाशी संपर्क केला मात्र त्यानी तक्रारीची कोणतीच दखल न घेता कार्यालयात येत आपले म्हणने मांडण्याची सूचणा केली त्यामूळे शेतकरी सह हरडे दूपारी एक वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पोहचले मात्र कार्यालयात तालूका कृषी अधिकारी उपस्थित नव्हते येथे एक तास वाट पाहूनही ते न पोहचल्याने उपस्थीत मंडळ अधिकारी संजय रामटेके यांचाशी उपरोक्त विषयावर चर्चा करीत ते परत आले अशा शेतकर्यांचा जिवनाशी निगडीत असलेल्या महत्वाचा प्रश्नासंदर्भात कृषी अधिकार्यांची अनास्था हा बेजबाबदार पणा आहे त्यामूळे त्यांचा कार्यपद्धतीची चौकशी करीत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तालुका कांग्रेस चे अध्यक्ष जयंत हरडे यानी केली आहे

Share

Other News

ताज्या बातम्या