*महाबळेश्वर शहर झाले कोरोना मुक्त* कोरोनामुक्त होणारे महाबळेश्वर ठरले पहीले शहर*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 15/06/2021 3:59 PM


(सातारा प्रतिनिधी)
महाबळेश्वर :  महाबळेश्वर येथे सक्रिय कोरोना रूग्णाची संख्या एक असुन हा एकमेव कोरोना रूग्ण पांचगणी येथे उपचार घेत आहे आज शहरात एकही कोरोनारूग्ण नाही त्या मुळे कोरोनामुक्त झालेले महाबळेश्वर हे जिल्हयातील पहीले शहर ठरले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही शहर कोरोना मुक्त झाल्याने पर्यटन स्थळ हे पर्यटकांसाठी खुले करावे अशी मागणी शहरात जोर धरू लागले आहे 
        दोन दिवसांपुर्वी गवळी आळी येथील एक महीलेला कोरोनाचा संसर्ग झाला ही महीला उपचारासाठी आता पांचगणी येथे दाखल करण्यात आले आहे या एका रूग्णांमुळे शहरात कोरोना झालेल्या रूग्णांची एकुन संख्या 781 झाली आहे या पैकी 22 रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर 758 रूग्ण आज अखेर कोरोनातुन बरे झाले आहेत सक्रिय रूग्ण संख्या 1 आहे शहरातील 45 वर्षांवरील नागरीकांची संख्या 3099 असुन या पैकी 1955 नागरीकांनी कोरोना लसीचा पहीला तर 621 नागरीकांनी दोन्ही डोस घेतले आहेत शहरातील 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींची संख्या 5021 असुन या पैकी 1017 व्यक्तींनी कोरोना लसीचा पहीला डोस घेतलेला आहे रोज ठराविक लसी उपलब्ध होत असुन लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे दरम्यान पालिकेतील 321 कर्मचारी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याची माहीती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली 
       कोरोनाच्या दोन्ही लाटेत मिळुन शहरात एकुन 264 ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून ते सिल करण्यात आले होते आज शहरात गवळी आळी येथील एका रूग्णाचे घर व परीसरात प्रतिबंधित क्षेत्र उरले आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जे लागु केले आहेत त्या नियमांचे उल्लंघन करणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे दंडात्मक कारवाईच्या 2392 केसेस करण्यात आल्या असुन या पासुन पालिकेने तब्बल 11 लाख 93 रूपयांचा दंड वसुल केला आहे अशी माहीतीही पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली 
        सातारा जिल्हा हा कोरोना संसर्गाच्या चैथ्या टप्प्यात असला तरी महाबळेश्वर शहर हे कोरोना मुक्त झाले आहे आता प्रशासनाने महाबळेश्वर बाबत नव्याने विचार करणे आवश्यक आहे महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही थंड हवेची ठिकाणं ही पर्यटनावर अवलंबुन आहेत विकंेडला महाबळेश्वर शहर वगळता तालुक्यात मोठया प्रमाणावर पर्यटक दाखल झाले होते या पर्यटकांना शहरात प्रवेश मिळत नसला तरी शहरा लगत असेलेल्या नागरी वसाहती मध्ये पर्यटकांना निवासासह सर्व सोई सुविधा मिळत आहेत अशा स्थितीत शहरात कोरोना नियमांचे कोटकोर पणे पालन करणारया सर्व व्यवसायिकांवर व नागरीकांवर हा अन्याय आहे लाॅकडाउन मुळे सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे अशा स्थितीत प्रशासनाने शहरातील नागरीकांना वेठीस त्यांचा अंत पाहु नये महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटन स्थळे सुरू करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे  
          : महाबळेश्वर शहर हे कोरोना मुक्त झाले असुन 45 वर्षांवरील 65 टक्के नागरीकांनी कोरोना लसीचा पहीला डोस घेतला आहे 18 ते 44 वयोगटातील युवकांना लस उपलब्ध होत नसल्याने त्यांचे लसीकरण कमी झाले आहे लसीचा पुरवठा वाढल्यात त्यांचेही 100 टक्के लसीकरण होणार आहे तेव्हा प्रशासनाने महाबळेश्वर सुरू करण्याचे आदेश दयावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांनी केली

Share

Other News

ताज्या बातम्या