*बामणोली-तापोळा सह अन्य गावांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी स्पीडबोट, ॲम्बुलन्स व आरोग्यसेवक पदांची उपलब्धता करा

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 15/06/2021 1:43 PM

 :  खा.श्रीनिवास पाटील*
सातारा :/ प्रतिनिधी : कोयना धरण परिसरातील  बामणोली-तापोळा सह अन्य गावांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सर्व सुविधायुक्त स्पीडबोट ॲम्बुलन्स व आरोग्यसेवक पदांची उपलब्धता करण्याच्या सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त एन.रामास्वामी यांना केल्या आहेत.
     खा.श्रीनिवास पाटील यांनी याबाबतचे पत्र लिहले असून त्यात म्हटले आहे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे व आ.मकरंद पाटील यांच्या उपस्थीत दि. 28 मे रोजी  सातारा येथे कोविड-19 ची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार बामणोली-तापोळा शिवसागर जलाशयात स्पीडबोट ॲम्बुलन्स व आरोग्य सेवे करिता पदाची उपलब्धता करण्याबाबतचा प्रस्ताव सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.10 जून रोजी तयार करुन आपल्या विभागाकडे मंजूरीसाठी पाठविला आहे.
    कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या दोन्ही तिरावर तापोळा, अहीर, रूळे, गावडोशी, आवळण, कोट्रोशी, खरोशी, शिरनार, देवळी, झांजवड, दाभेमोहन, दाभे, दुधगाव, आमशी, हरचंदी, कळंब, वेळापूर, पाली, तेटली, आपटी, निपाणी फुरूस, वाकी, रामेघर, वारसोळीदेव, गोगवे. लाखवड, देवसरे, येर्णे, सोनाट, खांबिल, दरे, तांब, अकणी, कुसापूर, निवळी, रवंदी, आडोशी, माडोशी, लामज, कांदाट, वाघवळे. खिरकंडी, चकदेव, मोरणी, वलवन, शिंदी, शेंबडी, वाघळी, काकोशी, वासोटा, अंबवडे, कारगाव, कालेवाडी, पिसाणी, ढेंन, मायणी, तळदेव, कुसवडे, वनकुसवडे अशी या भागातील सुमारे 60 गावे दुर्गम व डोंगराळ भागात विखुरली आहेत. याठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य सुविधा पुरविताना मोठ्या अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे शिवसागर जलाशयाच्या दोन्ही तीरावरील नमूद केलेल्या गावातील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा वेळेत पुरविण्याच्या दृष्टीने दोन स्पीडबोट ॲम्बुलन्स पथके कार्यान्वीत करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेतर्फे आपणाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजूरी देऊन बामणोली- तापोळा येथे सर्व सुविधायुक्त स्पिडबोट ॲम्बुलन्स व आरोग्य सेवेकरिता पदांची उपलब्धता करणेबाबतच्या प्रस्तावास तत्वता: मान्यता द्यावी. अशी सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या