मिरज अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी मिरज शहर सुधार समितीचा आक्रमक पवित्रा..

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/06/2021 8:36 AM


      मिरजेतील पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी मिरज शहर सुधार समिती आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी किसान चौकातच पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर सर यांची भेट घेतली.   या प्रकरणाची राजकीय हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणाचे आरोपपत्र दाखल होईपर्यंत पीडित मुलीसह तिच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे, पीडित मुलीला शासनाने आर्थिक मदत करावी, आरोपी फैयाज कोकणे याला नशेच्या गोळ्या आणि गुंगीचे औषध देणाऱ्या त्या दुकानावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक वीरकर सर यांनी पोलीस यंत्रणेने या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे तसेच या प्रकरणाचा तपास एका महिला पोलीस अधिकारीकडे दिल्याचे सांगितले. आरोपिला कडक शासन होण्यासाठी कायदे तज्ज्ञांची मदत घेणार असल्याचे समितीला सांगितले. यावेळी  समितीच्या महिला सदस्या सौ. रुपाली गाडवे, सौ. गीतांजली पाटील, सौ. सुनीता कोकाटे यांच्यासह ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, मुस्तफा बुजरूक, बाळासाहेब पाटील, असिफ निपाणीकर, सचिन गाडवे, श्रीकांत महाजन, अनिल देशपांडे, अक्षय वाघमारे आदी सदस्यांसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या