ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

'कुपवाड कोविड केअर' सेंटरला मा. विशालदादा पाटील यांची भेट व दिले संपूर्ण सहकार्याच्या आश्वासन.,


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/10/2021 8:40:32 AM


    कुपवाड शहर संघर्ष समिती व कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून उभारलेल्या कुपवाड कोविड केअर सेंटरला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,युवा नेते मा.विशाल दादा पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व समितीने उभे केलेल्या या कोविड सेंटरबद्दल कौतुक केले  व सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

दहा दिवसांचे उपचार घेऊन बरे झालेल्या पेंशटला आज डिस्चार्ज देण्यात आला.यावेळी युवा नेते मा.विशाल दादा पाटील यांच्या हस्ते रोपटे देऊन सत्कार करून कोविड सेंटरमधून निरोप देण्यात आला.

कुपवाड कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज झालेले पहिले पेंशट यांनी स्वतःहून कोविड सेंटरला मा.विशाल दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आर्थिक मदत केली.

यावेळी कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.सनी धोतरे, उपाध्यक्ष प्रविण कोकरे, कार्याध्यक्ष अनिल दादा कवठेकर,खजिनदार प्रकाश व्हनकडे,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवळ, संचालक राजेंद्र पवार,समीर मुजावर,विजय खोत,रमेश भानुशाली,अमोल कदम,श्रीकृष्ण कोकरे,भीमराव सरोदे, उपस्थित होते.

Share

Other News