देशातील पाहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उस्मानाबाद (धाराशिव) येथे कार्यान्वित , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले ऑनलाईन उदघाटन..

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/05/2021 9:45 PM



       देशातील पहिला ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने उभा केला आहे. आज या ऑक्सिजन प्रकल्पाचा उद्घाटन शुभारंभ राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडला.

साखर कारखान्यात प्राणवायू बनवून कोरोनाच्या संकट काळात जनतेला जीवनदान देणारा देशातील पहिला पायलट प्रकल्प म्हणून धाराशिव कारखान्याची नोंद झाली आहे. केवळ १७ दिवसात या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यातून २० टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. प्रकल्पामुळे धाराशिव जिल्हातील कोरोना बाधित रुग्णांना लागणारा प्राणवायू पूर्ण क्षमतेने पुरवला जाणार आहे. 

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याचे नाव देशात पोचवून ऑक्सिजनची निर्मिती करणारे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील हे पंढरीचा पांडूरंगच साक्षात धावून आल्याचं समाधान वाटते. त्यांनी दाखवलेले हे धाडस खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. श्री.पाटीलजी व पूर्ण संचालक मंडळ यांचे खूप खूप आभार..!

या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्य महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय ना.नितीनजी गडकरी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील साहेब, आरोग्य मंत्री ना. राजेशजी टोपे साहेब, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना. शंकरराव गडाख-पाटील साहेब, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील, कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील,जिल्हाधिकारी कौतुभ दिवेगावकर यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.


Share

Other News

ताज्या बातम्या