संधी साधू म्हणजे काय ??

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 14/05/2021 9:37 PM

           संधी साधू शब्द आपणास बरेच काही सांगून जातो. वेळ काळ न बघता फक्त पैसा मिळविणे यासाठी वापरला जाणारा फंडा म्हणजे संधी साधू 
           वेळोवेळी आपणावर अवेळी पाऊस अवकाळी पाऊस भुकंप. पूर. व आपले राजकीय वर्चस्व आपली दहशत निर्माण करण्यासाठी विविध पक्ष व राजकीय नेते पुढारी विविध सेवा भावी संस्था विविध सामाजिक संघटना  किंवा शासनाने एखाद्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लागु करण्यात येणारे १४४ कलम यामुळे जनतेच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो
           आजपर्यंत आपण मार्च २०२० दि २२/२३ तारखेला महाभयंकर महामारी सारखा एक विषाणू आपल्याकडे येतो आणि आपले जीवन विस्कळीत होतें. बांधकाम कामगार. कंपनी कामगार. विटटभटटी कामगार. वाहन चालक मालक   मोटर गॅरेज. घरकाम करणाऱ्या महिलां. पापड लोणची चटण्या यांचे उत्पादन करणारे महिला बचत गट. आपली लाल परी एस टी यांनी कामावरून काढून टाकलेले कामगार. वर्षभर सामाजिक नेते संघटना यांच्या सांगण्यावरून आपण न भरलेले लाईट बील पानपट्टी घरफाळा. व विविध बॅंका पतसंस्था विविध फायनान्स कंपन्या. यांची थकलेली देणी. हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे  हा सर्व प्रकार सर्वसामान्य जनतेला विचार करायला लावणारा आहे. आणि होता. काहीजणांना आपल्या कुटुंबाची ही परिस्थिती बघवली नाही त्यांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले. आणि आपली जीवनयात्रा संपवली. शासनाने गोरगरीब जनता व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अन्न धान्य वितरण केले तसेच केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य योजनेअंतर्गत ज्यांना रेशनकार्ड नाही. परगावी परजिल्ह्यातील परराज्यातील. मजूर कामासाठी आपल्या भागात आले आणि टाळेबंदी मुळे अडकून पडले त्यांना सुध्दा प्रती माणसी प्रती महिना पाच किलो मोफत तांदूळ वाटण्यात आला शासनाने कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये म्हणून अशा विविध योजना राबविण्यात आल्या
        नंतर सहा महिने सर्व व्यवहार सुरळीत चालले सगळं कसं व्यवस्थित चाललें होते. आणि अचानक एप्रिल महिन्यात जिल्हाधिकारी साहेबांनी आठवडा बाजार व इतर निर्बंध चालणारा आदेश जारी केला. हळूहळू हळूहळू सर्व बंद करत करत आज एक महिना संपत आला पूर्ण जिल्हा लाॅकडाऊन करण्यात आला आहे रोग व्हायरस प्रसार रोखण्यासाठी आपण घेत असलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो
         आत्ता फक्त परवानगी आहे ती म्हणजे अत्यावश्यक सेवा म्हणजे दुध. भाजीपाला. मेडिकल आणि किराणा माल  वेळ दिली ७/११  आत्ता ती सुद्धा बंद केली आहे  मुळ मुद्दा मला सांगायचा आहे तो म्हणजे जसे आपणं जनता व गोरगरीब. यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहात विविध निर्बंध घालून गर्दि कमी करा सॅनिटाईजर मास्क हॅनडगलोज याचा वापर करा हे सांगण्यासाठी प्रशासन व्यवस्था रात्र दिवस राबत आहे तसेच अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी दिलेल्या. दुकानदारांनी आपणाकडे अडविण्यात आलेल्या मालाचे मनमानी पद्धतीने दर आकारण्यास सुरवात केली आहे  दुकान शटर बंद असते आतून किराणा माल दिला जातो. तो सुध्दा बरोबर  जोकला जात नाही पैसे बरोबर आणि माल कमी असे सर्व काही चालू आहे   गोडेतेल. शेंगदाणे. गहू बाजरी मका ज्वारी तांदूळ तुरडाळ मुगडाळ मसुरडाळ बेसन पीठ खोबरेल तेल. पोहे रवा  उदा देतो गोडेतेल १७५ रु किलो आहे बेसन १००/११० रुपये किलो आहे  असा विविध प्रकारचा अन्न धान्य माल रोजच्या जीवनात लागणारे आहे आज या मालाचे दर मनाला येईल तसे लावले जातात. आम्हाला माल मिळत नाही. तुम्ही घ्यायचा असेल तर घ्या नाहीतर उपाशी मरा अशी बेजबाबदार पणाची उत्तरे दिली जातात         भाजीपाला फळे मोड मटकि. वांगी टोमॅटो मिरची बटाटा कोथिंबीर लसूण पालक व इतर अनेक प्रकारची भाजी आपणास रोज लागते शेतकरी यांचेकडून कवडी मोलाने हा भाजीपाला विकत घेऊन. मनमानी पद्धतीने दर आकारून शहरात विक्री केला जातो म्हणजे. कांदे ४० रु किलो. वांगी १०० रु किलो बटाटे ४०/५० रु किलो कोंतबीर पेंढी २०/३० असा एक नाही अनेक पध्दतीचा भाजीपाला मनमानी दराने विक्री केली जात आहे  त्यातच परवा रमजान महिन्यात रोझे धरण्यासाठी सकाळी नाष्ट्यामध्ये बटर बेकरी पदार्थ खरेदी केले जात होते तर त्याचा सुध्दा बेकरी उत्पादने करणारे बेकरी वाले यांनी डबल लावला होता. 
           शासनाकडे व नगरपालिका. जिल्हाधिकारी यांचेकडे आमची मागणी एवढीच आहे की जसे आपणं सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विविध निर्णय घेता तसाच या किराणा दुकान व भाजीपाला फळे बेकरी उत्पादने यांच्याबाबत दर निश्चित करण्यासाठी निर्णय घ्या नाहीतर रोगाने मरणयाअगोदर गोरगरीब जनता या दुकानदार यांच्याकडून आकारण्यात आलेल्या महागाई मुळें मरणार आहे. वेळ बघा काय आहे आणि मग सर्वसामान्य जनतेला लुटा. यांना शासन व अशा दुकानदारांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे 
         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९






देवेंद्र देविकार (विदर्भ प्रमुख संपादक)
7588888787

Share

Other News

ताज्या बातम्या