कोरोनामुक्त तुमसर करिता रोल मॉडेल ठरले "टीम तुमसर" चे उच्चशिक्षित चार युवक

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 14/05/2021 7:49 PM

तुमसर  :- 
            कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट लक्षात घेता तुमसरातील चार उच्चशिक्षित doयुवक प्रशासनाकडे बोट न दाखवता कोरोनामुक्त तुमसर करण्याकरिता समोर येऊन सामाजिक बांधिलकी जोपासून कोरोना संक्रमितांच्या परिवारानां निस्वार्थ सेवा देऊन माणुसकीचे उदाहरण शहरात चर्चेचे विषय ठरले आहें.
             प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत कठोर परिश्रम, जीवनमूल्ये आणि सत्य या तत्त्वावर चालत इतरांसाठी एक ‘रोल मॉडेल’ ठरलेले चार उच्चशिक्षित युवकांनी कोरोनाकाळात गरजूंना मदतीचा हात दिला. लहानपणापासून गरिबांचे चटके सहन केल्याने गरिबी काय असते, ते त्यांना चांगलेच ठावूक आहे. म्हणूनच गरिबांना मदतीचा हात देणारे युवकांनी संकटकाळात प्रत्येकाने एकमेकांना मदत केली पाहिजे. कोरोनामुळे शत्रूवरही जी वेळ येऊ नये, अशी वेळ नागरिकांवर आली. दोन वेळेचे जेवण मिळणेही त्यांना मुश्कील झाले होते.आपल्याकडून जितकी जमेल तेवढी मदत गरजूंना केली पाहिजे.आम्ही आमच्या परीने प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कोणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी घेतली. असे जय डोंगरे यांनी सांगितले तुमसर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून रुग्णांची संख्या वाढत आहे. गंभीर रुग्णांना रक्ताची तर काहींना प्लाझ्माची गरज भासते, परंतु त्याचाही तुटवडा आहे. रुग्णांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या नातेवाइकांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी हे चार उच्चशिक्षित युवक सरसावले आहें.शहरातील तरुणांनी कोरोनाला हरविण्यासाठी केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.गावातील नागरिकांना मास्क लावण्याबाबत, सोशल डिस्टन्स राखण्यासाबाबत ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. शहरातील रस्ते व घराघरात सॅनिटायझर फवारणी सुरू केली आहे.
             कोरोना संक्रमनाची भीती प्रत्येकाला लागून आहें त्यात कोण कोणाच्या मदतीला धावून येणार याचा पत्ताच राहिलेला नाही.परंतु सामाजिक माणुसकी जपून टीम तुमसर या नावाने कार्य करणाऱ्या या चार युवकांची चर्चा सध्या जोरात रंगली आहें. त्यात टीस मुंबई चे उच्चशिक्षित इंजिनिअर जय डोंगरे,हॉटेल तथा कापड व्यापारी अर्पित जयस्वाल, सॉप्टवेअर इंजिनियर आशिष जोशी,ब्लेसी सिनेमा हॉलचे मालक प्रदीप भरनेकर यांनी या कोरोनाच्या कठीण काळात उपजिल्हा रुग्णालया पासून ते तुमसर शहरातील वार्डाच्या गल्लोगल्लीत जाऊन सॅनिटायझर  केले अश्या या टीम तुमसर च्या माध्यमातून काम करत असलेल्या चार उच्चशिक्षित रोल मॉडेलांचे शहरात कौतुक होत आहें.






देवेंद्र देविकार (विदर्भ प्रमुख संपादक)
7588888787

Share

Other News

ताज्या बातम्या