सोशल डिस्टेंसचे सर्रास उलंघन रेशन दुकानदारला पाचशे रुपये दंड

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 14/05/2021 7:36 PM

खापरखेड़ा :-

          कोरोनाची महामारी दिवसेंदिवस वाढतच  असल्यामुळे स्थानिक  शासन प्रशासन व पोलिस विभाग यूद्धस्तरावर कार्य करत आहेत, अश्यातच  स्थानिक रेशन दुकानदार द्वारे  सोशल डिस्टेंसचें सर्रास उलंघन होताना दिसत आहे .  खापरखेडातील मयूरी स्वस्त  धान्य दुकान असून याचे मालक सुरेश 
रामटेके आहेत. काल गुरुवारी सकाळी दहा वाजता च्या सुमारास दुकानसमोर रेशन ग्राहकांची अधिकच गर्दी जमलेली होती. सर्व ग्राहक हे सोशल डिस्टेंसचें नियम न पाळता  एकमेकांच्या अगदी जवळ उभे व बसून होते. रेशन दुकान समोर सामाजिक  अंतर राखनेसाठी शासनाने  ठरवून दिल्यानुसार तीन फुट अंतराचे पांढरे गोळे सुद्धा बनविन्यात आले नव्हते . रेशन दुकानात ग्राहकांची गर्दी पाहता त्यांना नियंत्रित करनेसाठी रेशन दुकानदारद्वारे कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती किंवा एक कमर्चारी सुद्धा ठेवण्यात आला  नव्हता. रेशन दुकान  बाजाराच्या मुख्य रस्त्यालाच लागून असल्याने तेथील सर्व ग्राहक हे बाजारात ये जा करणाऱ्या अन्य ग्राहकांच्या  थेट संपर्कात येत होते  . 
             माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे राज्य कार्याध्यक्ष  शेखऱ कोलते  यांच्या निदर्शनात हा प्रकार आल्याने त्यांनी घटनास्थळावरुन  रेशन दुकान व ग्राहकांची  फोटो व वीडीओ सहित  पोलिस स्टेशन, ग्राम पंचायत, व तालुका पुरवठा अधिकारी कड़ें तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दक्षता घेवून  चिचोली (खापरखेडा) ग्राम पंचायत प्रशासनने सुरेश रामटेके यांच्या मयूरी स्वस्त धान्य दुकानवर पाचशे रुपये दंड ठोठावला आहे. कोलते यांनी दिलेल्या माहिती नुसार जिल्हाधिकारी नागपुर  यांच्या 17 एप्रिल 2020 च्या आदेशानुसार  सोशल डिस्टेंस विषयी उलंघन बाबत दोनशे रुपये प्रति ग्राहक दंड आणि दुकांनदाराने दुकानसमोर तीन फुट अंतराचे पांढरे गोळेची मार्किंग न केल्यास दुकानदाराला दोन हजार रुपये दंडची तरतूद आहे . सोबतच हाच गुन्हा पुन्हा केल्यास त्या दुकानदारावर  फौजदारी कार्यवाही करण्याचे सुद्धा आदेशात नमूद आहे. अर्थात ग्राम पंचायत द्वारे लावण्यात आलेला दंड हा नियमानुसार  खुप कमी असून केलेली कार्यवाही बेकायदेशीर आहे, याविषयी आदेशाचे उलंघन केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी नागपुर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करणार असल्याचे कोलते यांनी सांगितले .






देवेंद्र देविकार (विदर्भ प्रमुख संपादक)
7588888787

Share

Other News

ताज्या बातम्या