बलकवडे कोविंड केअर सेंटर मध्ये मोफत स्वॅप टेस्ट सुरू

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 14/05/2021 7:05 PM

बलकवडे कोविंड केअर सेंटर मध्ये मोफत  स्वॅप टेस्ट सुरू 

कोरोनाविषाणू साथीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि कर्तव्याचा भाग म्हणून झेप भरारी फाउंडेशन व बलकवडे कोविंड केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील नागरिकांसाठी आणखीन एक दिलासा बलकवडे यांनी दिला आहे. बलकवडे कोविंड केअर सेंटर मध्ये मोफत कोविड स्वॅप टेस्ट करण्याची परवानगी मिळाली आहे. या अनुषंगाने उद्यापासून मोफत एनटीजन व RTPCR टेस्ट सुरू होणार आहे. तरी भगूर शहरातील नागरिकांनी टेस्ट साठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही. कोरोना ची लक्षणे आढळल्यास लगेच चाचणी करून घ्यावी.अशी विनंती राष्ट्रवादी जिल्हा महिला अध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केली आहे मागील दहा दिवसापूर्वी त्यांनी 50 बेडचे बलकवडे कोविड केअर सेंटर चालू केलेले आहे तेथे सर्व रुग्णांना मोफत तपासणी व उपचार केले जातात आज पर्यंत तेथे सहा रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहे पंचवीस रुग्ण उपचार घेत आहे  महाराष्ट्र सह नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्गाने हैदोस घातलेला आहे. हा कोरोना रोग संसर्गाने वाढत असल्यामुळे व मागील वर्षापेक्षा या रोगाने चालू काळात आपणास आपले जवळचे नातेवाईक व सहकारी मित्र गमवावे लागत आहेत. सध्याच्या काळात हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता बेड. उपचाराची उपकरणे. औषधे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत हे आपण सर्वजण अनुभवत आहोत. प्रशासन नानातर्‍हेचे प्रयत्न करून कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे

Share

Other News

ताज्या बातम्या