गडचिरोली जिल्ह्यात 506 कोरोनामुक्त, 12 मृत्यूसह 266 नवीन कोरोना बाधित

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 13/05/2021 9:32 PM

गडचिरोली,(जिमाका)दि.13 
             आज जिल्हयात 266 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 506 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 26635 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 22503 वर पोहचली. तसेच सद्या 3545 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 587 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 12 नवीन मृत्यूमध्ये ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 54 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 38 वर्षीय पुरुष, चंद्रपूर जिल्ह्यातील 68 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 43 वर्षीय पुरुष, ता. कोरची जि.गडचिरोली येथील 47 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि.गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुष, ता. सिंदेवाही जि.चंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 45 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि.गडचिरोली येथील 58 वर्षीय पुरुष, ता. कोरची जि.गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.49 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 13.31 टक्के तर मृत्यू दर 2.20 टक्के झाला.
       नवीन 266 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 73, अहेरी तालुक्यातील 15, आरमोरी 14, भामरागड तालुक्यातील 4, चामोर्शी तालुक्यातील 54, धानोरा तालुक्यातील 19, एटापल्ली तालुक्यातील 11, कोरची तालुक्यातील 15, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 15, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 17, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 16 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 21 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 506 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 172, अहेरी 56,  आरमोरी 29, भामरागड 7, चामोर्शी 41, धानोरा 26, एटापल्ली 36, मुलचेरा 22, सिरोंचा 19, कोरची 9, कुरखेडा 31 तसेच वडसा येथील 58 जणांचा समावेश आहे.






फिरोज लालानी
(वाडसा तालुका प्रतिनिधी)
9421728186

Share

Other News

ताज्या बातम्या