नेहरू विद्यालयात कोविड सेंटर सुरु होण्याआधीच स्थानिक नागरिकांनी केला विरोध कोविड सेंटर दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची नगराध्यक्षाना केली मागणी

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 16/04/2021 5:41 PM



रोहित बोंबार्डे
तुमसर प्रतिनिधी :- वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तुमसर येथील नेहरू विद्यालयात नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी कोविड सेंटर सुरु करण्याचा पुढाकार घेतला मात्र,याला स्थानिक नागरिकांनी विरोध करून नेहरू विद्यालयात सुरु होत असलेला कोविड सेंटर दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची मागणी नगराध्यक्षासहीत जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनात केली आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आमच्याकडे वृद्ध लहान मुले आहेत.आमच्या जीवाला धोका आहे म्हणून या भागात कोविड सेंटर नको अशी भूमिका मांडण्यात आली शाळा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्यांची सहमती नं घेता कोविड सेंटर सुरु करने हे त्यांच्या मूलभूत मानवी हक्काचे कुठेतरी उल्लंघण होत असल्याचे नागरिकांत चर्चा आहे तरी नेहरू विद्यालयात सुरु होत असलेला कोविड सेंटर शहराच्या बाहेर कुठेतरी हलविण्यात यावे व  दुसऱ्या ठिकाणी सुरु करण्याची मागणी निवेदनकर्त्यांत विजय गभने, अमित बुरबादे, सतीश बुरबादे, नितीन पसीने, नितीन निनावे, अनिल डोंगरे, रुखमा मोहनकर, टारजन गाते, संजय मोहनकर, रिना बुरबादे, शैलेश रामटेके,बिसन बुरबादे या स्थानिकांनी केली आहे. प्रशासन काय निर्णय घेते याच्यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या