धानोरा / मुरुमगाव :-
धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 व्या जयंतीनिमित्त पोलिस मदत केंद्र मुरुमगाव हद्दीतील मौजे मुरुमगाव येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून पो म के मुरुमगाव येथील अधिकारी/अंमलदार यांनी रू 50,000/- निधी जमा करून गावातील बंद पडलेल्या ग्रामपंचायत शासकीय हॉलची दुरुस्ती करून,रंगरंगोटी करून,नवीन फर्निचर, तसेच 10'000/- रुपयाची स्पर्धा परीक्षा पुस्तके ऊपलब्ध करून दिली.
तसेच आज रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सो.धानोरा यांचे हस्ते शहीद गैंदकूवर फिरोदिया वाचनालय (शहीद महिला पोलिस शिपाई) चे उद्घाटन करण्यात आले व सदरचे वाचनालय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.यात सहभागी टीम AOP मुरुमगाव अध्यक्ष लता पुंघटे जि.प. सदस्या, प्रमुख अतिथी अजमन रावते माजी सभापती,चंद्रकांत धनके प्रभारी अधिकारी पोलीस मदत केंद्र मुरुमगाव, शिंदे पीएसआय, प्राध्यापक ओम देशमुख, जवळकर सर अभिजीत मेश्राम ग्रामपंचायत सदस्य जायभाय सर उपस्थित होते.
रोशन कवाडकर
(गडचिरोली जिल्हा समन्वयप्रमुख)
9405134666