बेळगाव लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळकेंना पाठींबा :- मंत्री जयंत पाटील

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/04/2021 4:01 PM


          बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने श्री. शुभम शेळके यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच इथल्या मराठी जनांना, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येथे शुभम शेळके यांना पाठिंबा देत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब, नेते छगन भुजबळ यांनी अनेक वेळा मराठी जनांच्या हक्कासाठी या भागात आंदोलने केली आहेत. महाराष्ट्राची, मराठी जनांची एकजूट कायम रहावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहतो, हा पाठिंबाही त्याचाच भाग आहे. 

देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खुश करण्यात व्यस्त असतात. दिल्लीला जे बरं वाटेल तेच ते करतात. महाराष्ट्रातही आम्हाला त्याचा प्रत्यय येतो. कोरोना संबंधित विषय असतील, राज्यातील बाकी मागण्या असतील त्यांनी महाराष्ट्राची बाजू घेणं अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. 

महाराष्ट्रात भाजपने पाच वर्षे सत्ता उपभोगली. त्यावेळीही फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. समितीविरोधात प्रचार करून, भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे त्यावरून सिद्ध झाले. मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम फडणवीस यांनी केले आहे. 

मराठी जनांचा आवाज संसदेत बुलंद करण्यासाठी याआधी महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणूक लढवली आहे. इथल्या विधिमंडळातही समितीचे लोकप्रतिनिधी आहेत. श्री. शुभम शेळके हा तरुण मराठी माणसांचे प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडेल हा मला विश्वास आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या