नऊ मृत्यूसह आज 328 नवीन कोरोना बाधित तर 145 कोरोनामुक्त -गडचिरोली

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 15/04/2021 10:26 PM

गडचिरोली,(जिमाका)दि.15:-
           आज जिल्हयात 328 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 145 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 13585 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11068 वर पोहचली. तसेच सद्या 2343 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 174 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. *आज 9 नवीन मृत्यूमध्ये* गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथील 72 वर्षीय व  50 वर्षीय दोन महिला,  कानचपूर ता. मुलेचरा 43 वर्षीय पुरुष,  रेड्डी गोडावून गडचिरोली 46 वर्षीय पुरुष,  गोकूल नगर गडचिरोली 55 वर्षीय पुरुष, वनश्री कॉलनी गडचिरोली 58 वर्षीय महिला , मानगडा ता. आरमोरी 68 वर्षीय महिला, पिंपलगांव ता. लाखानदूर जिल्हा भंडारा 65 वर्षीय पुरुष, शारदा कॉलनी ता. ब्रम्हपूरी जिल्हा चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष इ.चा मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.47 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.25 टक्के तर मृत्यू दर 1.28 टक्के झाला.

           नवीन 328 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 145, अहेरी तालुक्यातील 32, आरमोरी 24, भामरागड तालुक्यातील 23, चामोर्शी तालुक्यातील 19, धानोरा तालुक्यातील 06,  एटापल्ली तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 07,  कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 14, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 8 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 28 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 145 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 35, अहेरी 14,  आरमोरी 07, भामरागड 21, चामोर्शी 22, धानोरा 06, एटापल्ली 01, मुलचेरा 05, सिरोंचा 07, कोरची 05, कुरखेडा 07, तसेच वडसा 15 येथील जणाचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील  बाधितामध्ये 5  जणांचा समावेश आहे.






राजेश नाथानी (गडचिरोली तालुका प्रतिनिधी)
9422355550

Share

Other News

ताज्या बातम्या