कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे कुटुंबीय सर्रासपणे शहरात फिरत असल्यामुळे त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी : मा. उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख
कोरोणा पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांमुळे व त्यांच्या कुटुंबीयांमुळे भगूर शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच भगूर शहरामध्ये रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यास खरे जबाबदार जे नागरिक करोना पॉझिटिव्ह आहेत. व त्यांच्या घरातील सदस्य तसेच जे नागरिक पॉझिटिव्ह होऊन इलाज घेऊन घरी आले आहेत. डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे ते 14 दिवस क्वाईनटाईन घरात राहत नाही. सर्रासपणे शहरांमध्ये फिरत आहेत. तसेच काही पॉझिटिव्ह असणारे रुग्ण घरी क्वाईनटाईन होण्याच्या ऐवजी शहरांमध्ये सर्रासपणे फिरताना दिसत आहेत. तसेच आपल्या घरातील सदस्य पॉझिटिव्ह आहे. हे नागरिक लपवत आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या घरी भगूर नगरपालिकेतर्फे परिसराला कँटोन्मेंट झोन करतात परंतु रुग्णांवर व त्यांच्या घरच्यांवर कोणाचेही लक्ष नाही. तरी भगूर नगरपालिकेने पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांची सार्वजनिक ठिकाणी नावे लिहावीत जेणेकरून पॉझिटिव्ह असलेले लोक नागरिकांच्या लक्षात येतील. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णांची लागण वाढत असून सदरील पॉझिटिव रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांवर कोणाचाही वचक नसल्यामुळे व त्यांच्या निष्काळजीपणाचा धोरणामुळे इतर नागरिकांनाही त्याचा धोका उद्भवला जात आहे. भगुर नगरपालिकेने मग पोलिसांनी शहरांमध्ये सक्तीची लॉकडाऊनचे नियम लागू करावे तरी अशा नागरिकांवर भगूर नगरपालिकेने कठोर कारवाई करावी. अन्यथा दंड लावण्यात यावा .अशी मागणी भगूरकडून करण्यात येत आहे. अशी मागणी मा.उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख. नगरसेवक उत्तम आहेर. आर डी साळवे .संग्राम करंजकर. भाऊसाहेब गायकवाड. दिलीप मोजाड. श्याम गायकवाड. अनिल करंजकर. कैलास गवळी .भूषण गायकवाड. रत्नाकर आमले. सुनील जाधव .किशोर मोजाड.