कल्याण मध्ये जीव वाचवण्यासाठी रुग्णांना खुर्चींवर झोपवून ऑक्सिजन.…

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 15/04/2021 12:51 PM


कल्याण मध्ये जीव वाचवण्यासाठी रुग्णांना खुर्चींवर झोपवून ऑक्सिजन.…


विदारक वास्तव, ऐतिहासिक शहर, लाखोंची वस्ती, कोरोनाबाधितांसाठी बेड शिल्लक नाहीत....

कल्याण : कोरोनाचं थैमान इतकं भयानक वाढलंय की त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती शब्दांमध्ये सांगता येणार नाही. कल्याणमध्ये तर प्रचंड भयानक परिस्थिती आहे.इथे रुग्णांना बेड मिळणं खूप कठीण झाल आहे.सरकारी असो किंवा खासगी,सर्वच रुग्णा लये फुल झाली आहेत. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे.  अशा  परिस्थितीत अत्यवस्थ  किंवा ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना महा पालिका रुग्णालयात पेसेजमध्ये असलेल्या खुर्च्यांवर झोपवून ऑक्सिजन दिला जातोय. ही भयानक परि स्थिती बघून मनाला चटका बसेल. पण हे वास्तव नाकारता येणार नाही.कल्याण डोंबिवलीत कोरोना चा उद्रेक सुरुच आहे.

खाजगी असो किंवा महापालिका रुग्णालय, रुग्णां साठी बेडच नाही. तर खाजगी रुग्णालयात इंजेक्शन नाहीत.सध्याच्या घडीला परिस्थिती इतकी विदारक आहे की, कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयातील पॅसेज मधील खुर्च्यांवर आता रुग्णांना  झोपवून ऑक्सिजन दिला जात आहे. हे चित्र पाहून सगळ्यां नाच धक्का बसेल.

मागील २५ वर्षापासून शासन, प्रशासन व लोकप्रति निधी यांचे आरोग्यसुविधांवर लक्ष नसल्याने ही शहरा च्या शासकीय रुग्णालयाची परिस्थिती आहे .

Share

Other News

ताज्या बातम्या