'जागतिक स्तरावर मराठीचे स्थान आढळ ' कवी रविंद्र मालुंजकर

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 27/02/2021 6:58 PM

*जागतिक स्तरावर मराठीचे स्थान अढळ*                                                                 कवी रवींद्र मालुंजकर यांचे प्रतिपादन  
*देवळाली कॅम्प*:- शके १११० मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ असून त्यानंतर संत,पंत व तंत कवींनी लिहलेल्या रचना त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे कालखंडानंतर व आजच्या आधुनिक साहित्यिकांनी मराठी साहित्यात जी भर घातली त्यामुळे मराठी हि खऱ्या अर्थाने प्रगल्भ असून जागतिक स्तरावर देखील तिचे स्थान अढळ असेच राहिले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, साहित्यिक कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले.       
  देवळालीतील शिक्षण मंडळ भगूर संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह मधुसूदन गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवर देशपांडे, विलास भालेराव, भारत चव्हाण ,प्रा. डॉ. अरुण सोनवणे, प्रा. प्रतिभा निकुंभ आदी उपस्थित होते. यावेळी कवी मालुंजकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मराठी साहित्याचा प्रारंभापासून उलगडा करतांना कवितेचे प्रकार सादर करतांना पोवाडा,एक ओळी, दोन ओळी, हायकू,चारोळी, वात्रटिका, विडंबन यांवर प्रकाश टाकताना कवी विलास गोवर्धने यांची 'नंदा नंदे नंदावडे ', स्वलिखित लेक या कवितेसह येरे येरे पावसा या विडंबन कवितेला विद्यार्थ्यांनी दाद दिली. पत्रकार प्रवर देशपांडे यांनी पत्रकारितेतील मराठी भाषेचे विशद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य समीर महाले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. मृत्युंजय कापसे यांनी तर आभार प्रा.राणी झनकर यांनी मानले. याप्रसंगी प्रा.प्राजक्ता जोशी, प्रा.विदिशा कापसे, प्रा. विकास बगाव, प्रा. दिनेश बच्छाव, प्रा.राजश्री प्रजापती,प्रा.पूनम मगर, प्रा.बेबी सांगळे, प्रा.भारत सपकाळ यांसह विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या