मनपा क्षेत्रात बिनशेतीच्या हजारो बोगस नोंदी, तलाठी व मंडलअधिकारी यांची राज्यसरकारकडून चौकशी लावणार:- चंदनदादा चव्हाण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/02/2021 1:59 PM



सांगली : 
    अकृषक प्रस्ताव मंजुरीचे बाबत मा तहसीलदार व अप्पर तहसीलदार यांचे अधिकार काढून गावकामागार तलाठ्याना अधिकार जिल्हाधिकारी सांगली यांनी द्यावेत. अकृषक प्रस्ताव तलाठी व मंडळ अधिकारीच मंजूर करतात तेच अकृषक पावती काढतात त्यांची नोंद ही तेच धरतात मग गुंठेवारी नागरिकांनी तहसीलदार अप्पर तहसीलदार यांचेकडे का प्रस्ताव दाखल करावे ? हजारो नागरिकांची तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केली मोठी फसवणूक. मा जिल्हाधिकारी , प्रांत , तहसीलदार गप्प का आहेत ? नागरिकांना एन ए आदेश द्यायचे सरकारने बंद करून अकृषक मंजुरी द्यायचे आदेश असताना हे बिनभोबाट तलाठी कार्यालयात परस्पर तहसीलदार यांना डावलून निर्णय घेत आहेत ? यांची राज्य शासन स्थरावर चौकशी लावणार - गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण

सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील व सावळी , माधवनगर येथील तलाठ्यानी शासन आदेश धाब्यावर बसवून बिनशेतीच्या हजारो नागरिकांच्या अकृषक पावत्या काढू  थेट नोंदी घातल्या व मंडळ अधिकारी यांनी त्या निर्गत केल्याचे पुरावे समोर आले आहेत.

गुंठेवारी नागरिक बिनशेती /अकृषक आदेश नसल्याने त्यांची बँक प्रकरणे मंजूर होत नाहीत त्यांना तहसीलदार /अप्पर तहसीलदार यांचा आदेश मागितला जात असल्याने त्यांची प्रकरने आता वादाच्या भोवऱ्यांत अडकली आहेत .यांना कोणते वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत आहेत याचा एकदा सोक्ष मोक्ष लागला पाहिजे. तलाठयांचे बेकायदेशीर कामे गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती खपवून घेणार नाही .सरकारी दप्तर मधील सरकारचा कायदा धाब्यावर बसवून लोकांची फसवणूक चालणार नाही. 

   हजारो पुराव्यानिशी महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त व विभागीय आयुक्त शिवाय मुंबई हायकोर्टात या बाबत समिती जाणार असून हे प्रकरण धसास लावण्यात येणार आहे.  याबाबत मंडळ अधिकारी , तलाठी यांचे कार्यकाळातील कामकाजाची पूर्ण चौकशी करावी अशी मागणी करणेत येणार आहे. जेणे करून सर्व सामान्य गुंठेवारी जनतेची यापुढे फसवणूक होऊ नये .

  मा जिल्हाधिकारी यांचे पूर्ण पणें या बाबत दुर्लक्ष झाले आहे. वरिष्ठ अधिकारी एकमेकांना पाठीशी घालत आहेत ते का घालत आहेत या बाबत गुंठेवारी समितीकडे संपुर्ण पुरावे आहेत त्यांचे पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन लवकरच जाहीर करणार आहोत.

सर्व सामान्य गुंठेवारी नागरिक हैराण झाला आहेत पालिका क्षेत्रात लोकांना घरकुले मंजूर झाली आहेत मात्र त्यांना आदेश नसल्याने बँक कायदेशीर सल्लागार उघड पने गुंठेवारी नागरिकांना नाही म्हणत आहेत. आपण दोन पैसे देऊन बेकायदा नाव लावले आहे एन आदेश /अकृषक आदेश असल्या खेरीज लोण होणार नाही याला जबाबदार कोण ? याचे उत्तर मा जिल्हाधिकारी सांगली यांनी जाहीर रित्या गुंठेवारी आम जनतेला  द्यावे अशी अपेक्षा आम गुंठेवारी जनतेची आहे 
जिल्हा भ्रष्टाचार समिती कडून गेल्या दहा वर्षांत तक्रार दारांना न्याय मिळाला नाही मा जिल्हाधिकारी यांनी ही समिती रद्द करावी जनतेला याचा उपयोग राहिला नाही.

गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या या लोकहितासाठी घेतलेल्या निर्णया मुळे समाजातील अशा तलाठी मंडळ अधिकारी यांच्या बाबत समितीच्या कोणत्याही पदाधिकारी यांच्यावर दबाव आणण्याचा कोणी केविलवाणा प्रयत्न करू नये अशा व्यक्ती बाबत ताबडतोब मा जिल्हा पोलीस प्रमुख यांचेकडे नावानिशी तक्रार समिती करेल मग समोरचा कोणी कितीही मोठा असेल त्याला त्यांची कायद्याने जागा दाखवली जाईल हे लक्षात घ्यावे समिती या प्रकरणात दबावाला भीक घालून मागे हटणार नाही.

 *चंदनदादा चव्हाण : प्रदेशाध्यक्ष*
गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती 
भ्रमणध्वनी : 9421245003

Share

Other News

ताज्या बातम्या