रिलायन्स जिओ कामगारांची कंपनीकडून होणाऱ्या आर्थिक व मानसिक पिळवणुकविरोधात आंदोलन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/02/2021 10:22 AM



      दि. 22/02/2021 रोजी सांगली जिल्हा रिलायंस जिओ टेलिकॉम कामगारांची भेट घेऊन रिलायंस जिओ कंपनीकडून त्यांच्यावर होणाऱ्या आर्थिक व मानसिक पिळवणूक होणारे अन्यायाविषयी आणि त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांविषयी यूनियनशी आपुलकी पूर्व चर्चा झाली. त्यांच्या या सर्व मागण्या व न्याय हक्क मिळवून देण्यासाठी  महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे अध्यक्ष मा.मंत्री मा.सचिन (भाऊ) अहिर साहेब व सेक्रेटरी मा.शिवजी (भाऊ) काळे साहेब यांच्या मार्गदर्शना नुसार संबंधीत रिलायंस जिओ कंपनीला व त्याशी निगडीत सर्व प्रशासकीय अधिकारी यांना पत्राद्वारे निवेदन देऊन कामगारांवर होणार्‍या अन्याय व अत्याचार बाबतीत कळवण्यात आले. या अन्याय झालेल्या कामगारांच्या मागण्यावरती दि. 26/02/2021 रोजी पर्यंत कामगार न्याय हक्क शासन धोरणा प्रमाणे त्यांच्या मागण्यांवर कामगार कल्याणकारी सकारात्मक निर्णय द्यावा अन्यथा.
दि.27/02/2021 पासून संपूर्ण सांगली जिल्ह्यातील रिलायंस जिओ या कंपनीचे काम बेमुदत बंद राहील असा ईशारा कामगार व युनियन चे सचिव मा.शाहरुख नायकवडी यांनी दिला होता.
आजच्या 27 तारखे अखेर कंपनीने कामगार हिता बद्दल कोणताही निर्णय न घेतल्यामुळे बेमुदत काम बंद करण्या वेतरिक्त कोणताही पर्याय नाही. त्या मुळे आज पासून  जिल्ह्यातील रिलायंस जिओ या कंपनीचे काम बेमुदत बंद होणार आहे. या मुळे  जिल्ह्यातील रिलायंस जिओ ग्राहकांची कोणत्याही प्रकारची गैर सोय झाल्यास या सर्व गैरसोयीस व नुकसानीस रिलायंस जिओ कंपनी जबाबदार असेल याची सर्व जिओ ग्राहकांनी व  रिलायंस जिओ कंपनीचे नोंद घ्यावी......

Share

Other News

ताज्या बातम्या