सातारा;म्हसवड प्रतिनीधी ;-म्हसवड नगरपरिषदेच्या विद्यमान उपनगराध्यक्षा सौ स्नेहल सुर्यवंशी यांच्यावर सत्ताधारी परिवर्तन पैनलचे गटनेते धनाजी माने यांनी आज चौदा नगरसेवकांच्या सह्याचा अविश्वास ठरावाचा प्रस्ताव पालिकेचे नगराध्यक्ष भगतसिंग विरकर यांच्याकडे दिला
म्हसवड पालिकेच्या विद्यमान उपनगराध्यक्षा सौ सुर्यवंशी या गेली चार वर्ष पालिकेचे उपाध्यक्ष हे पद सोडत नसल्याने सत्ताधारी पार्टीतील इच्छुक नगरसेवकांवर अन्याय होत असल्याच्या कारणावरून पालिकेतील सत्ताधारी गटात या पदावरून गेली दोन महिने धुसफुस सुरू होती म्हसवड पालिकेची पंचवार्षिक निवडणुक हि या वर्षी होत असुन आता फक्त दहाच महिने शिल्लक राहिल्याने या पदावर इतर नगरसेवकांना संधी मिळावी अशी मागणी होत होती मात्र पालिकेच्या उपाध्यक्षा सौ सुर्यवंशी या राजीनामाच देत नसल्याने पालिकेचे गटनेते धनाजी माने यांनी पार्टीतील व विरोधी पार्टील सर्व नगरसेवकांशी चर्चा करून विद्यमान उपाध्यक्षा यांच्यावर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आज पालिकेचे नगराध्यक्ष भगतसिंग विरकर यांच्या कडे दिला
या अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर पालिकेचे चौदा नगरसेवकांच्या सह्या असुन यात धनाजी रामचंद्र माने, सौ सविता अनिल माने, कलावती सुरेश पुकळे, सौ सविता राहुल म्हेत्रे, गणेश शशिकांत रसाळ, दिपक ब्रम्हदेव बनगर, सौ हिंदमालादेवी विजयसिंह राजेमाने,डॉ वसंत सावळा मासाळ, साळुबाई दशरत कोळेकर, सौ शोभा जगन्नाथ लोखंडे, सौ मनिषा रविंद्र विरकर , रणजित दगडू येवगे, सौ तेजस्विनी संजय सोणवने, अकिल मैनुद्दीन काझी आदी नगरसेवकांच्या सह्या आहेत