वॉन्लेस हॉस्पीटलमध्ये मनसेच्या कामगार सेना व युनियनच्या नामफलकाचे अनावरण..

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/01/2021 7:42 PM

सांगली:
    आज वान्लेस हॉस्पिटल मिरज (मिशन हॉस्पिटल) मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, युनियनच्या नामफलकाचे व द्वारसभेचे अनावर करण्यात आले. कामगार सेनेचे सरचिटणीस #मा_श्री_सचिन_गोळे व सांगली जिल्हाध्यक्ष #मा_श्री_तानाजीराव_सावंत (फायटर  साहेब) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
शेकडो कामगारांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारले. कामगारांचे प्रश्न जाणून घेऊन व्यवस्थापकास जाब विचारण्यात आला.लवकरच कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील...
यावेळी जिल्हा सचिव आशिष कोरी,जि.उपाध्यक्ष संदीप टेंगले,कामगार सेना उपचिटणीस कुमार सावंत, सांगली शहर अध्यक्ष दयानंद मालपे, कुपवाड शहर अध्यक्ष विनय पाटील, तालुका अध्यक्ष भागेश भाट, उपाध्यक्ष अमित पाटील, मिरज शहर अध्यक्ष राजू पाटील, प्रवीण देसाई , जय कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या