युवक काँग्रेस कडून अर्णव गोस्वामीचा जोडे मारून निषेध.

  • YUNUS KHATIB (Pimpri Chinchwad )
  • Upadted: 19/01/2021 6:14 PM

पिंपरी-चिंचवड दिनांक:१९ समाजमाध्यमांमध्ये बीएआरसी चे पूर्व प्रमुख पाथों दास गुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांचे व्हाट्सअप वरील चॅट व्हायरल झालेले आहेत. यामध्ये अर्णव याने सैनिकांवरिल झालेल्या हल्ल्यांबाबतीत आनंद व्यक्त केल्याच्या व देश विरोधी भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ आज पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने अर्णव गोस्वामी व भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी अर्णव गोस्वामी च्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

युवक काँग्रेस च्या वतीने पिंपरी चौकात या बाबत हातात निषेध फलक घेऊन व झेंडे घेऊन निदर्शने करण्यात आली. या वेळी अर्णव गोस्वामी मुर्दाबाद, भाजपा का दलाल मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद, भाजपा सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या