प्रत्येक अपघातावेळी देवदुत म्हणून धावून जाणारे नगरसेवक अभिजित भोसले...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/01/2021 1:41 PM

#अपघाती_मदत
#मदत_नव्हे_कर्तव्यच

     काल वेलणकर मंगल कार्यालयासमोर रात्री 11वाजता अपघात झाला. मी समोरून जात असताना गर्दी असल्याने थांबून पाहिले तर एक तरुण अपघातात जखमी होऊन रक्तात पडलेला होता. त्यावेळेस इतर जमलेल्यानी सुद्धा त्याला मदतीसाठी 108 ऍम्ब्युलन्स, पोलीस अशा पद्धतीने प्रयत्न सुरु ठेवले होते. अजून ऍम्ब्युलन्स आली नव्हती. मी सुरु केलेल्या ऍम्ब्युलन्स सेवेतून ऍम्ब्युलन्सला घराजवळून यायला वेळ लागला असता, त्यामुळे वाट न पाहता मी स्वतःच्या गाडीतून त्या तरुणास स्वतः उचलून नेऊन सांगली सिव्हिल हॉस्पिटल ला दाखल केले. अपघात मोठा होता, दुचाकीवरून जाताना उभ्या गाडीस वेगाने ठोकल्याने जबर मार लागला होता. त्यामुळे तत्पर उपचारासाठी लगेचच हॉस्पिटलला नेणं आवश्यक असल्याने त्यास ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट केले. सध्या त्या युवकाची परिस्थिती स्थिर आहे.


## नगरसेवक अभिजीत भोसले

Share

Other News

ताज्या बातम्या