भोगवटादार २ मधील गुंठेवारी रहिवाश्यांनी पालिकेकडून प्रमाणपत्र व नकाशा घेतल्यास २५ टक्के नजराणा भरून भोगवटादार १ मध्ये रूपांतर करून घेता येणार :- चंदनदादा चव्हाण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/01/2021 12:04 PM

सांगली :
     महापालिका , नगरपालिका ,नगरपरिषद क्षेत्रात भोगावटादार २ मधील गुंठेवारी राहिवाश्यानी पालिकेकडून प्रमाणपत्र व जागेचा नकाशा घेतल्यास त्यांना बाजार मूल्याच्या ५० टक्के ऐवजी २५ टक्के नजराणा भरून भोगवटादार १ मध्ये रूपांतर करून घेतल्यास आपल्या मिळकती कायदेशीर होणार आहेत.

५ऑक्टोबर २०१९ च्या शासन आदेशा नुसार गुंठेवारी नागरिकांना आता सरकारने ३१ डिसेंबर २०२०अखेर गुंठेवारी विकास अधिनियम २००१ या अध्यादेशास मुदत वाढ दिलेली आहे त्यामुळे १जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत म्हणजे मधल्या २० वर्षातील गुंठेवारी प्लॉट खरेदीदार यांना याचा मोठा फायदा घेता येणार आहे. त्यासाठी आपल्या हिस्स्या पुरते क्षेत्र कायदेशीर होण्यास मा उद्धवजी ठाकरे सरकारने गोरगरीब जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे, त्याचा फायदा घेणे जरुरीचे आहे.

 यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे ;_
1) १९५९ ते आज अखेर सर्व फेरफार सर्व 7/13 उतारे.
2) इनाम पत्रक , मोडी लिपीत असेल तर त्याचे शासनाचे अधिकार पत्र असलेल्या दुभाश्या कडून मराठीत रूपांतर करून घ्यावे.
3) संबंधित पालिकेकडून झोन दाखला.
4) संबंधित पालिकेचे प्रमाणपत्र व मंजूर जागेचा नकाशा.
5) स्वताचे खरेदी पत्र व त्याची 7/12 उताऱ्या प्रमाणे लिंक दस्तऐवज. 
8) बांधपत्र , प्रतिज्ञापत्र.
   वरील प्रमाणे स्वता प्रस्ताव सादर केल्यास 25 टक्के नजराणा भरावा लागेल_ _प्रमाणपत्र व मंजूर जागेचा नकाशा नसल्यास 50 टक्के नजराणा शासनास भरल्यास आपले भोगवटादार 1 मध्ये रूपांतर होईल.

Share

Other News

ताज्या बातम्या